वृत्तसंस्था
ब्राझिलिया : Brazil ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो (७०) यांना तेथील सर्वोच्च न्यायालयाने सत्तापालटाच्या कटाच्या प्रकरणात २७ वर्षांची शिक्षा सुनावली. मंगळवारी हा निर्णय आला. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी २०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत पराभव होऊनही सत्तेत राहण्यासाठी सध्याचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा यांचे सरकार पाडण्याचा कट रचला होता.Brazil
सुनावणीदरम्यान बोल्सोनारोच्या कायदेशीर पथकाने न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंतिम अपील केली नाही, त्यानंतर न्यायमूर्ती अलेक्झांड्रे मोराएस यांनी २७ वर्षांची शिक्षा लागू करण्याचा आदेश दिला.Brazil
न्यायाधीशांनी आदेश दिला की, बोल्सोनारो यांना सध्या राजधानी ब्राझिलिया येथील फेडरल पोलीस मुख्यालयातच ठेवण्यात येईल, जिथे ते शनिवारपासून ‘पळून जाण्याची शक्यता’ असल्याने आधीच अटकपूर्व ताब्यात आहेत.
सत्तापालटाच्या कटाचे प्रकरण काय आहे?
ब्राझीलच्या सरकारी वकिलांचा आरोप आहे की बोल्सोनारो यांनी निवडणूक हरल्यानंतर सत्ता वाचवण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्याचा कट रचला राष्ट्रपती लुला डी सिल्वा आणि न्यायाधीश डी मोरायस यांच्या हत्येचा कट रचला लष्करी सत्तापालटाद्वारे निवडणुकीचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केला
गृह अटकेची मागणी फेटाळली
बोल्सोनारोच्या वकिलांनी त्यांच्या खराब प्रकृतीचा हवाला देत घरकैदेची मागणी केली होती, पण न्यायालयाने सर्व अपील फेटाळून लावली. न्यायमूर्ती मोराएस यांनी बोल्सोनारोचे सर्व दावे फेटाळून लावले.
माजी राष्ट्रपतींनी दावा केला होता की, गोंधळामुळे त्यांनी घोट्यावर लावलेले मॉनिटरिंग डिव्हाइस (इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर) वेल्डरने कापण्याचा प्रयत्न केला होता, तर न्यायालयाने म्हटले की, त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात डिव्हाइसला सोल्डरिंग आयर्नने जाळण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाने जो व्हिडिओ सार्वजनिक केला, त्यात मॉनिटर जळालेला आणि खराब झालेला दिसला. तरीही ते अजूनही बोल्सोनारोच्या पायाला बांधलेले आहे. फुटेजमध्ये बोल्सोनारोने कबूल केले की त्यांनी डिव्हाइसवर साधनांचा वापर केला होता.
ऑगस्टपासून बोल्सोनारो नजरकैदेत होते
ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बोल्सोनारो यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती मोरायस यांनी म्हटले होते की, बोल्सोनारो यांनी नजरकैदेत असताना आपल्या तीन खासदार मुलांमार्फत सार्वजनिक संदेश पाठवले, हे निर्बंधांचे उल्लंघन आहे.
बोल्सोनारो यांनी रियो डी जेनेरियोमध्ये त्यांच्या समर्थकांच्या एका रॅलीला त्यांच्या मुलाच्या फोनवरून संबोधित केले होते. यावेळी ते म्हणाले होते- गुड आफ्टरनून कोपाकबाना, गुड आफ्टरनून माय ब्राझील, हे आपल्या स्वातंत्र्यासाठी आहे.
न्यायालयाने याला नियमांचे सरळ उल्लंघन म्हटले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचे, इलेक्ट्रॉनिक एंकल मॉनिटर घालण्याचे आणि त्यांच्या घरातून सर्व मोबाईल जप्त करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App