विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Kalpana Bhagwat आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले.Kalpana Bhagwat
तिच्या घराच्या झडतीत १९ कोटींचा धनादेश, संशयास्पद प्रमाणपत्रे तसेच परदेशी नंबरशी नियमित संपर्क अशा अनेक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे या प्रकरणाला हेरगिरीची छटा असल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान,२६ नोव्हेंबर रोजी तिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. जवळगेकर यांनी १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाकडून ॲड. जरिना दुर्राणी यांनी बाजू मांडली. पुढील तपास सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत.Kalpana Bhagwat
या प्रकरणातील काही महत्त्वाच्या घटना अशा
१. आयएएस असल्याचा आव आणून ६ महिने पंचतारांकित हॉटेलात राहिली. संभाजीनगरात राजदूत येण्याच्या काळात हॉटेल तपासादरम्यान २२ नोव्हेंबर रोजी प्रकार उघड. २. पडेगाव परिसरातील घर असल्याचे तसेच तिचा अफगाणिस्तानचा प्रियकर असल्याचेही निदर्शनास आले. ३. पाकिस्तान पेशावर आर्मी, अफगाण ॲम्बेसी व ११ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले एका चॅटमध्ये मजकूर-‘अपना डीलर पाकिस्तान में है, मालूम है ना?’ असा उल्लेख. ४. अफगाणी प्रियकर अशरफ व त्याचा पाकिस्तानी भाऊ गालिब यमाशी व्हॉट्सअॅप कॉलवर संपर्क. ५. घरझडतीतून १९ कोटींचा धनादेश, त्यावर चेतन सुंदरजी भानुशाली या व्यक्तीचे नाव दिले असून त्यावर निखिल भाकरे आणि कल्पना भागवत अशी नावे असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. ६ लाखांचा दुसरा चेक; खात्यात ३२.६८ लाखांची नोंद ६. नागपूर विद्यापीठाच्या लेटरहेडवर बेस्ट आयएएस अधिकारी असे संशयास्पद प्रमाणपत्र; दिल्ली, मणिपूर, उदयपूर, जोधपूरकडे वारंवार विमानप्रवास.
सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले मुद्दे
आरोपीने चॅट हिस्ट्री मोठ्या प्रमाणात डिलीट केली; ती पुनर्प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास आवश्यक पाकिस्तानी लष्कराचे नंबर, डीलर पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संपर्क भारतीय सुरक्षेसाठी धोकादायक १९ कोटींचा चेक आणि खात्यातील ३२ लाखांचा स्रोत संशयास्पद, नेमका संबंध काय याचा तपास दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या काळात तिचा दिल्ली-मणिपूर-दिल्ली प्रवास जुळत असल्याने विशेष तपास आवश्यक प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले जाऊ शकते; अधिक कोठडी गरजेची अमित शाह यांचा ओएसडी अशा नावानेही एक मोबाइल क्रमांक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ओएसडी अभिषेक चौधरी अशा नावानेही एक नंबर कल्पनाच्या मोबाइलमध्ये आहे. त्यात ओएसडी टू होम मिनिस्टर ऑफ इंडिया असे नाव येत आहे. मात्र, हा नंबर बंद येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे ही व्यक्ती कोण आहे, याचाही तपास होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App