ममता बॅनर्जी देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकणार; पण पहिला धक्का कुणाला देणार??

Mamata Banerjee

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मतदार याद्यांचे शुद्धीकरण अर्थात special intensive revision SIR विरोधात जोरदार आगपाखड केली. त्यांनी एकाच वेळी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोग यांना धारेवर धरले. त्याचवेळी त्यांनी बंगाल जिंकायच्या नादात भाजप गुजरात हरून बसेल. मी देशभरात फिरून भाजपचा पाया हादरवून टाकेन, अशी दमबाजीची भाषा वापरली.Mamata Banerjee wants to pinch BJP, but she has punched Congress first

ममता बॅनर्जी यांचा एकूण राजकीय स्वभाव पाहता त्यांनी असा आक्रस्ताळेपणा करणे स्वाभाविक मानले पाहिजे. त्यांनी भाजपवर केलेली प्रखर टीका त्यांच्या स्वभावाचाच भाग मानली पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी जेव्हा देशभर फिरून भाजपचा पाया हादरवून टाकायची भाषा केली, त्या भाषेकडे मात्र चिकित्सक नजरेने पाहिली पाहिजे. कारण केवळ पश्चिम बंगाल पुरता प्रभाव निर्माण करून तो टिकवलेल्या ममता बॅनर्जी ज्यावेळी देशभर फिरतील आणि भाजप विरुद्ध वातावरण तापवतील, त्यावेळी त्या फक्त भाजपला धक्का देतील की अन्य कुणाचे राजकीय नुकसान करतील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



ज्यावेळी ममता बॅनर्जी यांच्यासारखे प्रादेशिक प्रभावी नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरची भाषा वापरते, त्यावेळी त्यांची महत्त्वाकांक्षा उकळून आल्याचे समोर येते आणि ती महत्त्वाकांक्षा कुठल्याही सत्ताधाऱ्याला छेद देण्यापेक्षा सध्याच्या राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकाला पहिली छेद देते. जर खरंच ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या बाहेर पडल्या आणि राष्ट्रीय पातळीवर येऊन त्यांनी भाजपशी टक्कर घ्यायचे ठरविले, तर त्यांच्या या राजकीय पावलामुळे पहिले नुकसान किंवा पहिला फटका तर काँग्रेसला आणि विशेषत: राहुल गांधींना बसेल. कारण राहुल गांधी अजूनही राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचा पर्याय म्हणून स्वतःला प्रस्थापित करू पाहत आहेत, पण गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये तरी त्यांना ते जमलेले नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने ज्यावेळी 99 खासदार निवडून आणले, त्यावेळी राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी राष्ट्रीय पातळीवर एक विशिष्ट आशा आणि अपेक्षा निर्माण झाली. त्यांच्याकडे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते पद सोपविले गेले. त्यामुळे त्यांचा सामना थेट नरेंद्र मोदींशी सुरू झाला. या सामन्यात आत्ता तरी नरेंद्र मोदी वरचढ ठरले.

– काँग्रेसची political space खातील

पण पुढची चार वर्षे हा मुकाबला होणार असताना जर मध्येच ममता बॅनर्जींचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर टप्प्याटप्प्याने उदयाला आले, तर त्याचा पहिला फटका राहुल गांधींना बसेल. कारण ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल बाहेर इतर राज्यांमध्ये प्रभाव निर्माण करायला जातील, तिथे आधीपासूनच कांग्रेस बळकट किंवा दुबळी विरोधी पक्ष आहे. ममता बॅनर्जी जेव्हा त्या राज्यांमध्ये स्वतःची स्वतंत्र political space निर्माण करायला जातील, तेव्हा सुरवातीला त्यांना तिथल्या विरोधी पक्षाची म्हणजे काँग्रेसची political space खावी लागेल आणि नंतर ममता बॅनर्जींच्या संघर्षाचा बाण नरेंद्र मोदींच्या दिशेने आक्रमक फिरेल. हे साधे राजकीय तर्कशास्त्र आहे.

अशा स्थितीत ममता बॅनर्जी यांनी मी भाजपला देशभरात हादरवून टाकेन, अशी जरी भाषा वापरली, तरी प्रत्यक्षात त्या भाषेतून नुकसान पहिले काँग्रेस आणि राहुल गांधींचे होईल. पण यात ममता बॅनर्जींचे वय आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व उभे राहायला लागणारा वेळ आणि वर्षे यांचे प्रमाण व्यस्त आहे. ममता बॅनर्जी आज 70 वर्षांच्या आहेत. त्यांना हे सगळे जमेल??

Mamata Banerjee wants to pinch BJP, but she has punched Congress first

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात