विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai BMC बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. नुकत्याच २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे चक्क १०३ वेळा नोंदवली गेल्याचेही यादीतून दिसून येते.Mumbai BMC
मुंबईच्या एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदारांपैकी ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे बोगस मतदारांची संख्या ११ लाखांवर पोहोचली आहे. मतदार यादीतील या महाघोटाळ्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. यादीतील त्रुटींवर ठाकरे गट शिवसेना आणि मनसेकडून वारंवार आक्षेप घेतले जात असताना, प्रशासनाने सुरुवातीला हे आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा नोंदवल्याचे सिद्ध झाल्याने प्रशासनाच्या या दाव्यातील हवा निघून गेली आहे. या मोठ्या घोळानंतर ११ लाखांहून अधिक दुबार नावांना वगळण्यासाठी बीएमसी प्रशासनाने तातडीने २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे.Mumbai BMC
हरकती नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख
मतदारांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यांना स्वतःहून अतिरिक्त नावे वगळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी दुबार नोंदणी आढळल्यास त्या मतदाराकडून ‘अन्यत्र मतदान केले नसल्याचे’ प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App