विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर फडकलेला धर्मध्वज भगव्या रंगाचा आणि त्यावर कोविदार वृक्ष अंकित आहे. कारण भगवा रंग हा धर्माचे प्रतीक आहे तर कविता वृक्ष हा रघुकुलाचे म्हणजेच श्रीरामांच्या वंशाचे प्रतीक आहे. याचे महत्त्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आजच्या कार्यक्रमात विशेषत्वाने सांगितले.Saffron is the color of religion, while the Kovidar tree is the symbol of Raghu family!!
मंदार आणि पारिजात हे दोन देव वृक्ष मानले जातात. या दोन देव वृक्षांचा संकर बनवून कोविदार वृक्ष तयार होतो. हा कोविदार वृक्षच भगवान श्रीरामांच्या रघुकुलाचे प्रतीक आहे. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहतात आणि इतरांना सावली देतात. ते फुलाफळांची निर्मिती करतात, ती स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी असते, असे सुभाषित सांगते. म्हणूनच भगवान श्रीरामांच्या रघुकुलाने कोविदार वृक्षाला आपले प्रतीक मानले, असे मोहन भागवत यांनी सांगितले.
भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे. भगवा रंग आपल्याला त्याग शिकवतो. आपल्या त्यागातून समाज जीवन उभे राहावे. ते फुलावे आणि फुलावे. मानवाने स्वार्थाच्या पलीकडे पाहून परमार्थाकडे वळले पाहिजे हे सुद्धा भगवा रंग सांगतो. धर्मध्वजाचा रंग भगवा आहे, याची आठवण मोहन भागवत यांनी करून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App