विशेष प्रतिनिधी
मुंबई : पार्थ अजित पवारच्या जमीन घोटाळ्यात आत्तापर्यंत काँग्रेस सकट अनेक विरोधकांनी अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता, पण मनसे त्यापासून अलिप्त होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परस्पर अनावरण करण्याच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी केस केली त्याबरोबर मनसेने फणा काढला आणि पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला.Parth Pawar’s land scam; Targeted from MNS poster!!
नवी मुंबईतल्या नितीन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकून ठेवला. नेत्यांच्या दिवस आणि वेळाच मिळत नाहीत म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी यातली राजकीय संधी हेरली आणि पुतळ्याभोवतीचे कापड हटवून त्यांनी परस्पर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.Parth Pawar
त्यामुळे नवी मुंबईतला राजकीय वाद उफाळला. पोलिसांनी अमित ठाकरे यांच्याविरुद्ध केस दाखल केली त्यांच्यावर समन्स बजावण्यासाठी पोलीस दादर मधल्या शिवतीर्थावर पोहोचले पण अमित ठाकरे यांनी पोलिसांच्या हस्ते तिथे समन्स स्वीकारले नाही. पोलीस रिकाम्या हाताने नवी मुंबईला परतले.
पण त्यानंतर अमित ठाकरे गप्प बसले नाहीत. त्यांनी मनसेची शक्ती प्रदर्शन करून नवी मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन समन्स स्वीकारले. पण त्यावेळी मनसेचे नेते शांत बसले नाहीत. त्यांनी नवी मुंबईत मोठ्या चौकांमध्ये अमित ठाकरे आणि पार्थ पवार यांची तुलना करणारी पोस्टर्स झळकावली. 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला “क्लीन चीट” आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल अमित ठाकरे यांना पोलिसांची नोटीस अशी तुलना या पोस्टर्स वर केली होती. मनसेने या पोस्टर्स मधून एकाच वेळी महायुतीतला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App