नुसते पैसे चारल्याचे आरोप करून उपयोग काय??; निवडणूक आयोगात गंभीर तक्रार का नाही केली दाखल??

नाशिक : अजित पवारांनी बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन त्यांना माघार घ्यायला लावली. उरलेल्या चौघांना वेगवेगळ्या मार्गांनी दबाव आणून माघार घ्यायला लावली, असा गंभीर आरोप अजित पवारांचे सख्खे पुतणे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीतले नेते युगेंद्र पवार यांनी केला.

बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल, भाजप पुरस्कृत स्वतंत्र पॅनल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कृत स्वतंत्र पॅनल अशी तिरंगी लढत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार त्यांनी बिनविरोध निवडून आणले. त्यामुळेच युगेंद्र पवार यांना पैसे चारून उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा आरोप करता आला.

– पैसे चारणे हा गंभीर गुन्हाच, पण…

पण एवढा गंभीर आरोप युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी किंवा त्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे अद्याप तरी त्यासंदर्भात कुठली गंभीर तक्रार केल्याची बातमी आली नाही. जर अजित पवारांनी 20 – 20 लाख रुपये चारून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे चार उमेदवार माघार घ्यायला लावले असतील, तर निवडणुकीच्या दृष्टीने तो गंभीर गुन्हा आहे. मग या गुन्ह्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात तक्रार का दाखल केली नाही??, हा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला.

की युगेंद्र पवार यांना नुसते आरोपांचे हिट अँड रन करून बारामतीची निवडणूक गाजवायची आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात थोडेफार यश मिळवून आणायचे आहे??, की त्यांना आपल्या काकांना निवडणूक आयोगाच्या गंभीर कारवाई पासून वाचवायचे आहे??, हे सवाल गंभीर आहेत.

– भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पवार कुटुंबाचे ऐक्य

आत्तापर्यंत कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप असो, पवार कुटुंबीय एक असतात आणि भ्रष्टाचार सकृत दर्शनी सिद्ध झाला तरी ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात, असे चित्र जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्यात त्याचबरोबर पार्थ पवारांच्या पुण्यातल्या जमीन घोटाळ्यात समोर आलेले दिसले. शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यांची मुलगी आणि पुतण्या एकमेकांपासून वायले झाले, तरी भ्रष्टाचार प्रकरणातल्या आरोपांवरून त्यांनी एकमेकांना समर्थनच दिले, हे राजकीय चित्र सगळ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले.

– निवडणूक आयोग तक्रार नाही

त्यामुळे आता सुद्धा युगेंद्र पवार यांनी अजित पवारांनी बारामतीत आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या चार उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन माघार घ्यायला लावली, असा जाहीर आरोप केला, तरी त्यांनी अजूनही निवडणूक आयोगात त्या संदर्भात गंभीर तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या निवडक भूमिकेवर पुन्हा एकदा ठळक प्रश्नचिन्ह उभे राहिले. बारामतीतल्या भाजप नेत्यांनी सुद्धा या संदर्भात पुढाकार घेतलेला दिसले नाही.

Pawar family always “one” in corruption practices

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात