मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी पवार आणि राऊतांचा डाव!!

Raut's plot

नाशिक : मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगवेगळे महाराजांनी खेळला डाव!!, असे राजकारण आज मुंबईत दिसून आले.Congress to accept MNS; Pawar and Raut’s plot to undermine the “self-reliance” of that party in various ways!!

मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी ऐक्य साधून युती केली. काँग्रेसने स्वबळावर लढायची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी आखणी करायला सुद्धा सुरुवात केली. पण मध्येच कुणाची तरी माशी शिंकली. काँग्रेसच्या नेत्यांना राजकीय अवदसा आठवली आणि ते शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक मध्ये गेले. तिथपासून “कळ” फिरली. महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली.



– बारामती + माळेगावात अजित पवारांपुढे नांगी

बारामती, माळेगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नांगी टाकणाऱ्या शरद पवारांनी मुंबईत डाव खेळला. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून मनसेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायची सूचना केली. त्यासाठी त्यांनी आपण दिल्लीतला आपला प्रभाव वापरू, असे वेगळ्या पद्धतीने सुचित करून मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास डळमळीत केला.

– संजय राऊतांची सोशल मीडिया पोस्ट

एकीकडे शरद पवारांनी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना टप्प्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर आजारी संजय राऊत पुढे आले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना डिवचले. ठाकरे बंधू एकत्र आलेच आहेत कारण लोकांची तशी इच्छा आहे. इतरांच्या कुणाच्या परवानगीची त्यासाठी गरज नाही. मुंबई वाचवण्यासाठी शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा आमच्या बरोबर आलेत, असा टोमणा संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना हाणला. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला महाविकास आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. (पण त्याची आम्हाला पर्वा नाही), असे संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले. या सोशल मीडिया पोस्ट मधून संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने दबाव वाढविला.

शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस नेत्यांवर दबाव वाढविला तरी त्यांचा मूळ उद्देश एकच होता, तो म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांचा स्वबळाचा आत्मविश्वास खाचवायचा. तो त्यांनी साध्य करायचा प्रयत्न केला.

Congress to accept MNS; Pawar and Raut’s plot to undermine the “self-reliance” of that party in various ways!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात