श्री भगवान सत्य साईबाबांनी मानवसेवा हाच खरा धर्म मानला; जन्मशताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा वाटप

Chief Minister Fadnavis

विशेष प्रतिनिधी

पुट्टपर्थी, (आंध्र प्रदेश) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुट्टपर्थी, आंध्रप्रदेश येथे भगवान श्री सत्य साई बाबा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त प्रमुख उपस्थिती दर्शवली. Chief Minister Fadnavis

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्य एकच असते, पण त्याला अनेक नावे दिली जातात. आज तेच सत्य एका नावातून तेजाने प्रकट होत आहे, ते म्हणजे ‘भगवान श्री सत्य साई बाबा’. पुट्टपर्थीतील प्रत्येक कणात त्यांचे नाव आहे, प्रत्येक वाऱ्याची झुळूक त्यांची आठवण देऊन जाते.

भगवान श्री सत्य साई बाबा यांचे निस्वार्थ प्रेम आणि अद्वितीय मानवसेवा पाहून, महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची प्रचिती येते. ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या शेवटी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी ‘पसायदान’ ही पवित्र प्रार्थना अर्पण केली. तसेच अनेक अर्थांनी, भगवान श्री सत्य साई बाबा यांचे जीवन आणि त्यांचे कार्य हे पसायदानाच्या भावनेचे साक्षात मूर्त स्वरूप आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भारतात गुरु हे केवळ शिक्षक नसून आपल्या जीवनाला आकार देणारी जीवनधारा असतात. गुरु परंपरा म्हणजे युगानुयुगे अखंडतेने प्रज्वलित असलेला पवित्र दीप आहे. गुरु वशिष्ठ यांच्या पासून भगवान गौतम बुद्ध यांच्या पर्यंत ते भगवान महावीर यांच्या पासून भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या पर्यंत ही दिव्य ज्ञानाची सरिता सतत वाहत आली आहे. भगवान श्री सत्य साई बाबा यांच्यासाठी मानवसेवा हाच खरा धर्म आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सत्य साई ट्रस्टद्वारे एक सेवारूपी भव्य विश्व उभे झाले आहे. यात रुग्णालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक परिवर्तनाची अनेक केंद्रे आहेत, जी विनामूल्य जगातील सर्वोत्तम सेवा देतात. आज सत्य साई ट्रस्ट भारत सरकारसोबत नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) सोबत उच्च गुणवत्तेची डिजिटल साधने तयार करण्यासाठी कार्यरत आहे आणि या योगदानाची सर्वत्र प्रशंसा होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



साई संजीवनी रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य केल्या जातात. त्यांना नवे आयुष्य, नवी आशा आणि नवे भविष्य दिले जाते. आजपर्यंत लाखो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच सामाजिक सेवेद्वारे सुमारे 1600 पेक्षा जास्त गावांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि अनेक गावांना सौरऊर्जा मिळू लागली आहे. दररोज लाखो गरजू व्यक्तींना पौष्टिक अन्न दिले जाते. ही सेवा म्हणजेच भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या अपार प्रेमाची आणि मानवकल्याणाच्या दृष्टीची जिवंत साक्ष आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

– ऑटोरिक्षांचे वाटप

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्री सत्य साई बाबा यांना पुष्पांजली अर्पण करून मंगल आरतीमध्ये सहभागी होत त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थ्यांना ऑटो रिक्षांचे प्रातिनिधीक स्वरुपात चावी वाटप केले.

यावेळी ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपति, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार अशोक चव्हाण, आमदार अभिमन्यू पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Chief Minister Fadnavis distributes auto rickshaws to beneficiaries

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात