नाशिक : मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू यांनी स्वतंत्र भूमिका जाहीर करत मुंबई महापालिका निवडणुका लढवायचे निर्णय घेतले असले तरी तिथे महाविकास आघाडीसाठी शरद पवार आग्रही झालेत, पण त्यांचा हा आग्रह महाविकास आघाडी घडविण्यासाठी आहे की ठाकरे बंधू आणि काँग्रेस या दोघांच्याही मनसूब्यांवर पाणी फिरवण्यासाठी आहे??, असा सवाल तयार झाला आहे. Mahavikas Aghadi
मुंबईत सुरुवातीला ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आपला इरादा स्पष्ट केला होता. आपली लढाई भाजप आणि शिंदे सेनेशी आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, हे ठाकरे बंधूंनी ओळखून ते एकत्र आले. पण मधल्या मध्ये काँग्रेसला वेगळेच धुमारे फुटले. म्हणून काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचा निर्णय जाहीर केला. या सगळ्या प्रक्रियेत महाविकास आघाडी न घोषणा करताच संपुष्टात आली. ठाकरे बंधू आणि काँग्रेस या दोघांनीही महाविकास आघाडीची पर्वा केली नाही. त्यांनी शरद पवारांनाही आपल्या निर्णयाविषयी काही विचारले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकीय पटावर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडली. Mahavikas Aghadi
– काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या दारी
पण दोनच दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची सिल्वर ओक मध्ये जाऊन भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांना मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत शिरायची संधी मिळाली. मुंबई महापालिका निवडणुका आपण महाविकास आघाडी म्हणून लढवू त्यामध्ये मनसेला घेऊ, अशी सूचना त्यांनी केली. तशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. महाविकास आघाडीत मनसे नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती कारण मनसे मुळे आपली हिंदी भाषकांची मते जातील याची भीती काँग्रेसला वाटली त्याचबरोबर काँग्रेस जर स्वबळावर लढली तर मतांची फूट पडून आपलाही तोटा होईल असे उद्धव ठाकरे यांच्या सेनेला वाटले म्हणून उद्धव ठाकरेंच्या सेनेने काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी केली.
– मनसेला काँग्रेसच्या गळ्यात घालायचा डाव
पण या सगळ्यात शरद पवारांची एंट्री झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला वेगळेच वळण लागले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई काही ताकद नसताना अचानक शरद पवारांना काँग्रेसच्या नेत्यांनी अकारण महत्त्व देऊन त्यांना महापालिका निवडणुकीत ओढले. पण शरद पवारांची राजकीय ख्याती अशी की त्यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडी जोडण्यापेक्षा त्या आघाडीचे पक्ष वाकविण्यातच धन्यता मानली. ठाकरे बंधू आणि काँग्रेस आपापल्या मार्गाने निघाले असताना मध्येच त्यांनी महाविकास आघाडीचा खोडा घातला. त्याचबरोबर काँग्रेसला मनसे आघाडीत नको असताना मनसेला काँग्रेसच्या गळ्यात घालायचा प्रयत्न केला. यातून पवारांनी महाविकास आघाडीत मोठी पाचर मारून ठेवली.
– कात्रजचा घाट कोण दाखवणार??
आता मुंबई महापालिकेचे निवडणूक लढवायची असेल, तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना आपल्याकडे यावे लागेल याची “राजकीय व्यवस्था” शरद पवारांनी करायचा प्रयत्न केला. अर्थात ते तसे घडेलच याची कुठलीही गॅरेंटी नाही. कारण ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे केव्हा कोणता निर्णय घेऊन पवारांना सुद्धा “कात्रजचा घाट” दाखवतील, याची कुणी खात्री देऊ शकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App