नाशिक : कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा दिला. भाजपच्या स्वबळाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला असा फटका दिला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून भाजपने इनकमिंग करून घेतले याच्या बातम्या माध्यमांनी भरपूर दिल्या त्यावरून गाजराच्या पुंग्या वाजवल्या पण प्रत्यक्षात भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणके हाणले, त्या बातम्यांकडे मात्र माध्यमांचे दुर्लक्ष झाले किंवा त्यांनी हेतूतः दुर्लक्ष केले.
– कोल्हापुरात हसन मुश्रीफांना दणका
कोल्हापूर जिल्ह्यातले राजकारण आपल्या बोटावर फिरवणाऱ्या हसन मुश्रीफांच्या नाड्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवडल्या. कोल्हापूर जिल्ह्यातले स्थानिक राजकारण केवळ स्थानिक पातळीवर न ठेवता ते मुंबई पर्यंत खेचून आणले. हसन मुश्रीफ यांना त्यांचे पारंपारिक राजकीय वैरी समरजीत सिंह घाटगे यांच्याशी तडजोड करायला लावली. कोल्हापूर मधले स्थानिक राजकारण राष्ट्रवादीच्या गटातटांमध्ये अडकून पडले होते ते देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या पद्धतीने आपल्या ताब्यात घेतले. आपल्या इशाऱ्यावर हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांना चंदगड, कागल मध्ये “सरळ” केले. या बातम्या काँग्रेसी वळणाच्या माध्यमांनी दिल्या. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठ थोपटली. जे आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या दिग्गजांना सुद्धा जमले नव्हते, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले, असे कोल्हापूर मधल्या वेगवेगळ्या माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले. हसन मुश्रीफांचे हात ED कारवाईच्या दगडाखाली अडकलेत त्याचा पुरेपूर फायदा भाजपने उचलला.
– मुंबईत नवाब मलिकांशी तडजोड नाही
एकीकडे हसन मुश्रीफ यांच्या नाड्या आवळताना दुसरीकडे भाजपने मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीची सूत्रे नवाब मलिकांकडे सोपवली. पण नवाब मलिक हेच मुंबईतले राष्ट्रवादीचे नेते असतील तर भाजप त्यांना बरोबर घेणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी दिला. त्यामुळे अजित पवारांना जेवढा धक्का बसला त्यापेक्षा जास्त धक्का नवाब मलिक यांना बसला. कारण त्यांची मुलगी सना हिला राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणून सुद्धा नवाब मलिक यांची राजकीय अडचण दूर होऊ शकली नाही किंबहुना भाजपने ती दूर होऊ दिली नाही. दाऊद इब्राहिमशी मनी लॉन्ड्री करून गरीब मुस्लिम महिलांची जमीन बळकावणाऱ्या नवाब मलिक यांना भाजपने जो झटका द्यायचा तो आधी दिला आणि आज पुन्हा एकदा दिला.
मुंबई महापालिकेत भाजपला स्वबळावर सत्ता मिळवायची, तर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि राज ठाकरेंच्या मनसेशी टक्कर घ्यावी लागेल, त्याच पद्धतीने भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी टक्कर घेऊन नवाब मलिक यांचा विषय संपवून टाकला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App