विशेष प्रतिनिधी
पुणे : पार्थ पवारच्या मुंढवा जमीन घोटाळ्यात शितल तेजवानी सलग दुसऱ्यांदा पोलीस आयुक्तालयात हजर झाली. पोलिसांनी तिची दुसऱ्यांदा चौकशी केली. तिला सर्व कागदपत्रांसह पुन्हा हजर राहायला सांगितले. परंतु, अजूनही पोलिसांनी तिला अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या आणि महसूल खात्याच्या एकूणच कारभाराविषयी दाट संशय तयार झाला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भातला धक्कादायक खुलासा केला. Partha Pawar
या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार गुंतला असल्याने पोलीस आणि महसूल खात्याने दिरंगाई चालविली आहे. जमीन घोटाळ्यातले आरोपी या गुन्ह्यातले सगळे पुरावे नष्ट करू शकतात हे माहिती असूनही पोलिसांनी शितल तेजवानी आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक केली नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. Partha Pawar
पुणे पोलिसांनी मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानी हिचा जबाब तर घेतला, पण तिला अटक केली नाही. कारण कोणताही मुद्देमाल जप्त करायचा नाही. आता दिग्विजय पाटीललाही अटक करण्याची गरज नाही आणि उद्या जर पार्थ पवारविरुद्ध गुन्हा दाखल झालाच तर “अटकेची गरज नव्हती” असा बचावही करता येईल, अशी पोस्ट विजय कुंभार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिली.
– अधिकाऱ्यांनी काय केली “कमाल”??
त्यापलीकडे जाऊन पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीला ही जमीन देताना अधिकाऱ्यांनी काय घोळ घातला याचाही खुलासा विजय कुंभार यांनी केला.
मुंढवा जमीन घोटाळ्यात अधिकाऱ्यांनी कमाल केली. अधिकाऱ्यांनी अगदी जमीनसुद्धा जंगम (Movable) मालमत्ता म्हणून दाखवून व्यवहार केला.
पवनपुत्र हनुमानानंतर जमिनीला Movable समजण्याची करामत फक्त महाराष्ट्रातील काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांनाच जमू शकते.
मुठे समिती अहवालात नमूद केले आहे की :
• ७/१२ उताऱ्यावर “मुंबई सरकार” अशी मालकी दाखवलेली, आणि ७/१२ उतारा “बंद” आहे. • प्रॉपर्टी कार्डवरही “मुंबई सरकार” नावे मालकी नोंद. • तरीही सह-दुय्यम निबंधकांनी ई-म्युटेशनमध्ये मुद्दाम “Skip” करून मिळकत जंगम () दाखवली. • आणि त्यावरच सरळ खरेदीखत नोंदणी करून टाकली!
सरकारी जमीन, ७/१२ बंद, प्रॉपर्टी कार्ड सरकारी… तरीही जमिन Movable दाखवून नोंदणी?प्रशासनातील बजरंगांची कमाल!!, असे विजय कुंभार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App