एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचेय, म्हणून तर…

Modi Shah

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचे आहे, म्हणून तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काल गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना भेटीची वेळ देऊन प्रत्यक्ष भेट दिली, हे मोठे राजकीय सत्य महाराष्ट्रातले विरोधक आणि “पवार बुद्धीची” मराठी माध्यमे विसरली. म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली नाराजी बहिर्वक्र भिंगातून पाहात त्याचे रिपोर्टिंग केले. Modi Shah

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काही विशिष्ट ठिकाणी शिवसेना फोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून घेत असतील, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज होणे स्वाभाविक आहे. तशी नाराजी स्वतः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे व्यक्त केली नाही, पण त्यांच्या 7 मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून ती नाराजी व्यक्त करायला लावली. त्यानंतर काल आणि परवा मोठे राजकीय नाट्य मुंबईत रंगले. परंतु, ते नाट्य “फार मोठे” आहे. महायुतीत एकनाथ शिंदे मोठे नाराज आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात द्वैत निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला निघून गेले आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी खलबते केली, अशा प्रकारच्या बातम्या “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी चालविल्या. शिंदे आणि फडणवीस यांच्यातले मतभेद बहिर्वक्र भिंगातून दाखवून ते “प्रचंड मोठे” असल्याचे सगळ्या महाराष्ट्राला भासविले.

परंतु ते तेवढेच राजकीय सत्य नव्हते, हे मात्र पवार बुद्धीचे मराठी माध्यमे आणि महाराष्ट्रातली विरोधक पूर्ण विसरून गेले. किंबहुना त्यांना ते सत्य पचले नाही.



 एकनाथ शिंदे – अमित शहा भेट

साधी गोष्ट आहे, एकनाथ शिंदे जर देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे यांना भाजपला खरंच महायुतीतून दूर करायचे आहे असे गृहीत धरले तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना वेळ देऊन भेट घेतलीच कशाला असती?? त्यांनी एकनाथ शिंदे यांना सरळ वाटण्याच्या अक्षता लावल्या नसत्या का??, हे साधे सवाल सुद्धा “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांमधल्या अतिबुद्धिमान पत्रकारांना पडले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्या सवालांवर खऱ्या अर्थाने कधी विचारच केला नाही.

– एकनाथ शिंदेंना मोदी + शाह भेटतात याचा अर्थच…

ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांना आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि नंतर गृहमंत्री अमित शाह यांनी भेटीची वेळ दिली, त्यांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. त्या अर्थी एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचा मोदी आणि शाह यांच्या जोडगोळीचा इरादा आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये टिकणे आवश्यक आहे हे उघड राजकीय सत्य आहे. हे सत्य “पवार बुद्धीची” मराठी माध्यमे जाणत नसली, तरी मोदी -:शाह जाणतात. म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटी देऊन आपल्या जवळ ठेवले आहे. त्यामुळे मोदी आणि शाह हे कुठल्या स्थानिक निवडणुकीत किरकोळ किंवा मोठे वाद झाले, तर त्या वादात लक्ष घालतील आणि लगेच महायुतीत कुठला सुरुंग लागेल हे स्वप्न पाहणे म्हणजे आपण जरी “पवार बुद्धीचे” असलो, तरी प्रत्यक्षात राजकीय दृष्ट्या बावळट आहोत हेच मराठी माध्यमांनी आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांनी सिद्ध केले.

– नितीश कुमार – एकनाथ शिंदे तुलना अनावश्यक

मोदी आणि शाह हे एकनाथ शिंदे यांना नीतीश कुमार यांच्या एवढी राजकीय किंमत देणार नाहीत. किंबहुना तशी देणे शक्यही नाही. कारण नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात त्यांच्या राजकीय अनुभवात जमीन आस्मानाचा फरक आहे, हे कुठल्याही “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांपेक्षा मोदी आणि शाह जास्त जाणतात. सलग 20 वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले नितीश कुमार आणि भाजपनेच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर बसविलेले एकनाथ शिंदे यांच्यात खरं म्हणजे कुठली राजकीय तुलनाच होऊ शकत नाही. शिवाय बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील राजकीय परिस्थिती कमालीची भिन्न आहे. त्या राजकीय परिस्थितींमध्ये सुद्धा तुलना होऊ शकत नाही. अशा स्थितीत एकनाथ शिंदेंना एक न्याय आणि नितीश कुमार यांना दुसरा न्याय असली भाषा वापरून माध्यमांनी रिपोर्टिंग केले म्हणून राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही.

Modi + Shah wants to keep mahayuti intact with Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात