Nitish Kumar : नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी, आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Nitish Kumar

वृत्तसंस्था

पाटणा : Nitish Kumar  जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीशकुमार गुरुवारी पाटणा येथील गांधी मैदानात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शपथ घेणार आहेत. ते १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.Nitish Kumar

बुधवारी सकाळी ११:३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश यांची नेतेपदी निवड झाली. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड झाली आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली.दुपारी ३:४६ वाजता विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश यांची एकमताने नेतेपदी निवड झाली.Nitish Kumar



नितीश स्वतःचाच विक्रम मोडणार

नितीश गुरुवारी १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन इतिहास रचतील. ते स्वतःचाच विक्रम मोडतील. यापूर्वी त्यांनी ७ व्या, ८ व्या आणि ९ व्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला होता.या यादीत त्यांच्यानंतर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता आणि हिमाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा समावेश आहे. दोन्ही नेते प्रत्येकी सहा वेळा मुख्यमंत्री राहिले.

Nitish Kumar Swearing-in 10th Time Bihar CM NDA Leader Gandhi Maidan Modi Photos Videos Ceremony

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात