नाशिक : सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालु क्यातल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत पवार संस्कारितांची भांडणे उघड्यावर सत्तेच्या मस्ती खोरीत एकमेकांना ठोकताना शेलक्या शब्दांचा वापर!!, हे राजकीय चित्र सगळ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी दिसले. Angar Nagar Panchayat election
राष्ट्रवादीत संपूर्ण राजकीय आयुष्य काढलेले माजी आमदार राजन पाटील यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले, पण त्यांच्यातले पवारांच्या राष्ट्रवादीतले संस्कार काही संपले नाहीत. ते पवारांच्या संस्कारांसह भाजपमध्ये आले आणि तेच संस्कार त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी जाहीरपणे सगळ्या महाराष्ट्राला दाखविले. हे तेच राजन पाटील आहेत, ज्यांनी पाटलाच्या पोरांना ओठांवर मिशा फुटण्यापूर्वी पोरं होतात, असे मस्तीखोर वक्तव्य केले होते.
अनगर नगरपंचायत आपल्याच ताब्यात राहावी यासाठी राजन पाटलांनी साम दाम दंड भेद वापरून तिथली निवडणूक बिनविरोध केली. भाजपचे 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. पण नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उज्वला थिटे यांना तिकीट देऊन उभे केले. त्यामुळे अनगरकर पाटलांचा संताप झाला. आपल्याच गावात येऊन आपल्याला एका महिलेमार्फत आव्हान दिले जात आहे, हे त्यांना सहन झाले नाही. या सगळ्या प्रकारात बरेच राजकारण घडले आणि उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्जच प्रशासकीय यंत्रणेने बाद केला. त्याबरोबर अनगरकर पाटलांनी सगळ्या गावात गुलाल उधळून प्रचंड जल्लोष केला. अनगरकर राजन पाटलांचा मुलगा बाळराजे पाटील यांनी अजित पवारांच्या दिशेने बोट दाखवून सगळ्यांचा नाद करा. अनगरकरांचा नाद करू नका, अशी दमबाजी आपल्या जुन्या मालकांना केली. राष्ट्रवादीतली जुनी मस्तीखोरी भाजपमध्ये आल्यानंतरही कायम असल्याचे दाखवून दिले.
– अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांची दमबाजी
त्या पाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीतले नेते सुद्धा नगरकर पाटलांवर चिडले. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल मस्तीची भाषा करता तुम्हाला योग्य वेळी योग्य ते उत्तर देऊ असा प्रतिदम अमोल मिटकरी यांनी दिला. अनगरच्या बाळाने उडता तीर अंगावर घेतलाय. लवकरच झुकतील गर्विष्ठ माना, असा दम सूरज चव्हाणने दिला. हा तोच सूरज चव्हाण ज्याने सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती.
या सगळ्या प्रकारामुळे अनगर नगरपंचायतीचे निवडणूक सगळ्या महाराष्ट्रात गाजली. सगळे राजकीय आयुष्य राष्ट्रवादीत काढलेल्या राजन पाटलांना भाजपने पक्षामध्ये घेतले, तरी त्यांच्यातले जुने राष्ट्रवादीचे “पवार संस्कार” गेले नाहीत, हेच यातून सगळ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App