येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!

नाशिक : येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!, अशा पद्धतीचे दुहेरी राजकारण आज भाजपने खेळले. स्थानिक पातळीवरच्या राजकारणात कोण कोणाशी युती किंवा आघाडी करते याला राज्य पातळीवर किंवा केंद्र पातळीवर फारसे महत्त्व नाही स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक नेते आपापल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार निर्णय घेतात त्या निर्णयांना राज्य पातळीवर युती किंवा महायुती म्हणून मूल्यमापन करू नये, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करून महायुती होणे किंवा न येणे याला फारसे महत्त्व दिले नाही, तरी देखील भाजपने भविष्यकालीन राजकारणावर लक्ष केंद्रित करून बारकाईने नियोजन करत नगरपालिका निवडणुकीत उतरण्याचे ठरविलेले दिसले.

भाजपच्या या रणनीतीचा भाग म्हणूनच येवल्यात भाजपने छगन भुजबळांच्या राष्ट्रवादीशी युती केली पण त्याच वेळी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी लढत करण्याचा निर्णय घेतला. येवल्यात भाजप आणि भुजबळांच्या राष्ट्रवादीच्या युतीने उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या रुपेश दराडे यांनी त्याच पदासाठी अर्ज दाखल केला.



– बारामतीत पवार कुटुंबीयांशी युती नाही

महाराष्ट्रातील ओबीसी वोट बँक जास्तीत जास्त पक्की करण्याच्या दृष्टीने भाजपने ओबीसी नेत्यांना अनावश्यक दुखवायचे नाही असे ठरविले म्हणूनच येवल्यात छगन भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपने समसमान भूमिका घेऊन भुजबळांबरोबर युती केली, पण त्याचवेळी भ्रष्ट परिवार म्हणून ज्यांची ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्रात अधोरेखित झाली, त्या पवार कुटुंबीयांशी मात्र बारामतीत युती किंवा आघाडी केली नाही. बारामती नगरपरिषदेत भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार उतरविला. इतकेच नाही तर बारामती नगर परिषदेच्या 41 जागांवर भाजपने स्थानिक आघाडी करून पवार काका पुतण्याची टक्कर घ्यायचा निर्णय घेतला. भाजपच्या स्थानिक आघाडीने गोविंद देवकाते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पूर्णपणे स्वतंत्र निवडणूक लढवत बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांना त्याच पदासाठी निवडणुकीत उतरविले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. पण आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ, असे पवारांच्या राष्ट्रवादीतले स्थानिक नेते युगेंद्र पवार यांनी आधीच जाहीर करून ठेवलेय.

– भाजपने साधून घेतले राजकारण

या सगळ्यात भाजपने स्वतःचे स्वतंत्र राजकारण साधून घेतले. छगन भुजबळ यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी ते जुने आहेत. शिवाय त्यांच्यावरील आरोपांची सध्या चर्चा देखील महाराष्ट्रात थंडावली आहे. त्या उलट अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची चर्चा मात्र फारच जोरावर आहे. त्यामुळे भुजबळांशी युती करून त्यांच्या सत्तेत येवल्यात वाटा मिळवायचा आणि अजित पवारांशी बारामतीत टक्कर घेऊन स्वतःची भ्रष्टाचार विरोधी प्रतिमाही जपायची, हा दुहेरी डाव भाजपने नीट खेळल्याचे दिसून येते.

BJP alliance with Chagan Bhujbal but fighting with Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात