बांगलादेश स्वतंत्र करण्याची शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागली “किंमत”; हीच खरी मोहम्मद युनूस नावाच्या पाकिस्तानी मनोवृत्तीची फ़ितरत!!, याचा अनुभव पुन्हा एकदा बांगलादेशात आला.
पाकिस्तानी पंजाबी लष्करी वर्चस्ववादाविरुद्ध लढा देऊन शेख मुजिबूर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तान पासून तोडून काढून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. त्यानंतर बांगलादेशात 1971 ते 1975 असे चार वर्षे राज्य केले पण पाकिस्तानी मनोवृत्तीच्या बांगलादेशी लष्कराने राजकीय सूड उगवून शेख मुजिबूर रहमान यांची सगळ्या कुटुंबीयांसह हत्या केली. त्याचीच पुढची आवृत्ती आज बांगलादेशच्या न्यायालयाने शेख मुजिबूर रहमान यांची कन्या शेख हसीना वाजेद यांना फाशीची शिक्षा सुनावून काढली.
– पाकिस्तानी प्रवृत्ती ठेचली नाही म्हणून…
पश्चिम पाकिस्तान पासून तुटून पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश झाला तरी 50 – 55 वर्षांनंतर तिथली पाकिस्तानी प्रवृत्ती पूर्ण ठेचून काढू शकला नाही म्हणूनच लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शेख हसीना वाजेद यांच्या सरकारला हिंसक आंदोलनामुळे पायउतार व्हावे लागले आणि त्यापुढे जाऊन फाशीची शिक्षा सुनावून घ्यावी लागली.
शेख हसीना यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हत्याकांडाचा कट रचला. काही हत्या घडवून आणल्या. काही हत्या घडवून आणणार होत्या. देशातल्या सगळ्या विरोधकांना संपविणार होत्या. त्यांनी मानवते विरुद्ध गुन्हा केला म्हणून त्यांना फाशीची शिक्षा योग्य असल्याचा निर्वाळा बांगलादेशी न्यायालयाने दिला त्यासाठी 456 पानांचे भले मोठे निकाल पत्र लिहिले.
पण या सगळ्याचे सार असे, की बांगलादेशात पाकिस्तानी मनोवृत्तीचा राज्यकर्ता राज्य करत असताना लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानाला आधी पदच्युत केले नंतर फाशीची शिक्षा सुनावत आपल्या मार्गातला काटा दूर करायचा डाव खेळला.
– नोबेल पुरस्कार विजेत्याचा डाव
आता बांगलादेशच्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ सरकार प्रमुखाने भारताला पत्र लिहून शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात सोपविण्याची मागणी केली. जेणेकरून शेख हसीना यांना बांगलादेशात नेऊन फाशी द्यायची आणि आपली पाकिस्तानी मनोवृत्तीची सत्ता जास्त बळकट करायची असा त्याचा हेतू आहे.
पण मोहम्मद युनूसच्या राजवटीतल्या न्यायालयाने शेख हसीना यांना मानवतेच्या विरोधात कारवाया केल्या म्हणून फाशीची शिक्षा सुनावली, त्या मोहम्मद युनूसच्या राजवटीत सर्वाधिक हिंसाचार घडला. अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार झाले. आठ दिवस ढाका आणि बाकीची शहरे जळत होती, त्यावर बांगलादेशी न्यायालयाने चकार शब्द उच्चारलेला नाही. किंवा मोहम्मद युनूसला बांगलादेशातल्या हिंदू विरोधी मानवता विरोधी अत्याचारांसाठी जबाबदार ठरविलेले नाही.
– पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी चुंबाचुंबी
कारण शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोहम्मद युनूस पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होता त्यांच्या लष्कर प्रमुखांशी वाटाघाटी करत होता. मधूनच तो चीनला जाऊन आला. पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेला याच मोहम्मद युनूसने बांगलादेशात पुन्हा नुसता आश्रय दिला नाही तर सन्मानाचे स्थान दिले त्यानंतरच शेख हसीना यांच्या फाशीची शिक्षा सुनवण्याच्या प्रक्रियेला जास्त वेग आला. पाकिस्तानी प्रवृत्तीच्या लष्करी राजवटीने शेख मुजिबूर रहमान यांचे सगळे कुटुंब संपविले. शेख हसीना यांच्या रूपाने शेवटचा अंश उरला होता तो सुद्धा खपविण्याचे कारस्थान रचले, तेच आज कायद्याच्या चौकटीत राहून फळाला आणले गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App