राहुल + प्रियांकांमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे करिअर बरबाद; कम्युनिस्ट खासदाराने मिसळला मोदींच्या आवाजात आवाज!!

Rahul–Priyanka

नाशिक : काँग्रेसच्या सध्याच्या नामदारांनी त्यांच्याच पक्षाच्या तरुण खासदारांचे करिअर बरबाद केले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यांच्या आरोपाला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, पण कम्युनिस्ट खासदाराने पाठिंबा दिला. त्यामुळे मोदींच्या दाव्याला काँग्रेसच्या मित्रपक्षाने पुष्टी दिल्याचे राजकीय वास्तव समोर आले. Rahul–Priyanka

बिहार विधानसभा निवडणुका झाल्यानंतर येथे झालेल्या काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या वेगळ्या शैलीत केली त्यांनी काँग्रेस मधल्या गांधी परिवाराला नेहमीप्रमाणे टार्गेट केले पण ते टार्गेट करताना नवा मुद्दा समोर आणला काँग्रेसच्या नामदारांनी त्यांच्याच पक्षाच्या तरुण खासदारांचे करिअर बरबाद केले या तक्रारी त्यांचेच खासदार आम्हाला भेटून करतात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेसचे नामदार आम्हाला संसदेचा वेळ बरबाद करायला सांगतात.

गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडायला भाग पाडतात. पण त्यामुळे आमचेच करिअर बरबाद होते, हे त्यांना दिसत नाही. कारण आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न संसदेत मांडले नाहीत, तर आम्ही लोकांना जाऊन काय उत्तर देणार आणि लोक सुद्धा आम्हाला पुन्हा संसदेत कसे पाठवणार??, असे सवाल काँग्रेसचे तरुण खासदार आम्हाला भेटून विचारतात, असे मोदी म्हणाले.



  • जॉन बिट्रास यांचा दुजोरा

मोदींच्या या वक्तव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा खासदार जॉन बिट्रास यांनी दुजोरा दिला. त्यांचा एक व्हिडिओ भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला. संसद वारंवार बंद पडणे हे चांगलेच नाही, पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ते करायला काँग्रेसच्या खासदारांना भाग पाडतात. अनेकदा INDI आघाडीत विरोधकांच्या एकत्रित बैठका होतात. त्यावेळी मी संसद बंद पाडायला विरोध केला. त्यावेळी माझे काँग्रेसच्या नेत्यांशी काही मतभेद झाले‌. प्रत्येक वेळेस संसद बंद पाडणे योग्यच नाही. कारण तिथे प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यायचा नाही. मंत्र्यांना सवाल विचारायचे नाहीत, तर जाऊन करायचे काय??, हा सवाल मी विचारला पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माझ्या सवालाला उत्तर दिले नाही, असे वक्तव्य जॉन बिट्रास यांनी त्या मुलाखतीत केले. त्यामुळे काँग्रेसच्याच मित्र पक्षाने राहुल गांधींचे आणि प्रियांका गांधींचे नेतृत्व उघडे पाडले, हे चित्र सगळ्या देशासमोर उभे राहिले.

  • गांधी बंधू भगिनींची गोची

एरवी हे जॉन बिट्रास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या धोरणांना विरोध करणारे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी राज्यसभेत अनेकदा मोदी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या संबंधांविषयी सुद्धा अनेकदा तिखट शब्दांमध्ये टीका केली. पण त्यांच्यासारख्या तिखट टीकाकाराने सुद्धा मोदींनी काँग्रेसच्या तरुण खासदारांविषयी व्यक्त केलेली चिंता उचलून धरल्याने काँग्रेसची आणि विशेषतः राहुल गांधी + प्रियांका गांधी या भाऊ बहिणीची मोठीच राजकीय गोची झाली.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात