कसली आलीये Vote chori??; कमी करा सीना जोरी!!

Congress leaders

कसली आलीय vote chori??; कमी करा सीना जोरी!! हा सल्ला दुसरा तिसरा कुणी नाही, तर काँग्रेस प्रेमी पत्रकारांनीच राहुल गांधींना आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिलाय. Congress leaders

राहुल गांधींनी बिहार विधानसभा निवडणुकीत जेवढा म्हणून प्रचार केला, त्यामध्ये त्यांनी फक्त Vote chori च्या मुद्द्यावर भर दिला होता. बाकीच्या मुद्द्यांकडे त्यांनी इतर दुर्लक्ष केले किंवा ते miss fired करून टाकले, याचा अनुभव ज्येष्ठ पत्रकारापासून ते अगदी टीव्हीचे bites घेणाऱ्या रिपोर्टरपर्यंत सगळ्यांनी घेतला आणि तो शेअर केला.

राहुल गांधींनी बिहारमध्ये vote chori च्या विरोधात मतदार अधिकारी यात्रा काढली. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तेजस्वी यादव यांना बरोबर घेतले, पण नंतर ते campaign मध्येच अर्धवट सोडून ते कंबोडियाला निघून गेले. त्याचा दुष्परिणाम काँग्रेसवर झाला. कारण राहुल गांधींच्या मतदार अधिकारी यात्रेत टाईटपणे वावरणारे काँग्रेसचे नेते नंतर ढिल्ले पडले. त्यांनी राहुल गांधींचे ते campaign परिणामकारकतेने पुढे नेलेच नाही. मोठ्या gap नंतर राहुल गांधी पुन्हा बिहारमध्ये आले आणि त्याच त्याच vote chori च्या मुद्द्यावर भाषणे देत फिरले, पण तोपर्यंत राहुल गांधींचा vote chori चा मुद्दा बिहारमध्ये संपुष्टात आला होता, याची कबुली ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी दिली. त्यांनीच काँग्रेसला विनम्रपणे पराभव स्वीकारा, असा स्पष्ट आणि परखड सल्ला दिला.

– आधी छाती पुढे, नंतर छाती आत

त्यापलीकडे जाऊन आज तकच्या रिपोर्टर्सनी काँग्रेस कार्यालयातले केसरी सांगून त्यांची जास्तच पोलखोल केली. मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस जेव्हा 17 जागांवर आघाडीवर होती, तेव्हा काँग्रेसचे नेते छाती पुढे काढून आपणच आघाडीवर असलेले उमेदवार शिफारस केलेले होते असे सांगत होते, पण तासाभरातच चित्र बदलले आणि छाती पुढे काढणारे नेते छाती आत घालून कुठेतरी निघून गेले नंतर ते माध्यमांच्या समोर bite द्यायला आलेच नाहीत.

राहुल गांधींनी बिहारमध्ये एका तळ्यात मासेमारीसाठी डुबकी मारली. त्यांच्याबरोबर महागठबंधनचे उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार मुकेश सहानी सुद्धा होते. मुकेश सहानींच्या हाती एक मासा लागला. तो त्यांनी राहुल गांधींच्या हातात दिला. राहुल गांधींनी तो मासा त्यांच्याबरोबर डुबकी मारलेल्या कोळ्यांकडे देण्याऐवजी तो पुन्हा तळ्यात सोडून दिला. त्यामुळे मुकेश सहानींनी डोक्यावर हात मारला. हाताला लागलेला एक मासा सुद्धा राहुल गांधींनी पुन्हा तळ्यात सोडून दिला. याचा अर्थ आपण आमदारकी गमावली, अशी हाताशा मुकेश सहानी आली.



– बिहारी जनतेची अस्मिता दुखावली

राहुल गांधींनी बिहारी जनतेचा वेगवेगळ्या प्रकारे अपमान केला त्यांनी छठ पूजेची खिल्ली उडविली. पण त्यापलीकडे जाऊन बिहारी सगळीकडे मजदूरी करतात. त्यांना देशातल्या इतर राज्यांमध्ये किंमत नाही, असे चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यामुळे बिहारी जनतेची अस्मिता दुखावली. कारण बिहारने अनेक IAS, IPS अधिकारी देशाला दिले. ते कार्यरत होते. अनेकजण आजही कार्यरत आहेत. खासगी कंपन्यांमध्ये बिहारचे अनेक लोक मोठ्या पदांवर काम करत आहेत. अनेक छोट्या मोठ्या गावांमधले बिहारी तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे सरकताहेत ही महत्त्वाची बाब राहुल गांधींच्या गावीच नव्हती. त्यांनी फक्त बिहारचे लोक मजुरी करतात, यावर भर देणारी भाषणे केली. तो बिहारी जनतेला अपमान वाटला, तोच अपमान राहुल गांधींना बाराच्या भावात गावात घेऊन गेला, असे परखड निरीक्षण आज तकच्या पत्रकारांनी नोंदविले.

शेखर गुप्ता काय किंवा आज तकचे पत्रकार काय हे काँग्रेसला बिहारमध्ये काहीतरी मिळेल अशा आशेत आणि अपेक्षेत होते. पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या हाती मोठा भोपळा आला. त्याचे दुःख या सगळ्यांना झाले. ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले. पण राहुल गांधी या काँग्रेस प्रेमी पत्रकारांचे कळकळीचे म्हणणे ऐकणार का??, आणि त्यावर अंमलबजावणी करणार का??, हे कळीचे सवाल आहेत.

Congress leaders must accept defeat with humility

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात