Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- तेजस्वींच्या सभेतील गर्दी AI ची होती का? बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती एआयची होती का? असा सवाल करत, बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे आहेत, असे म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या ‘गणितावर’ प्रश्न उपस्थित केले.Uddhav Thackeray

बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले, पण त्याचवेळी आपला संभ्रमही व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, ” आमदार चषक स्पर्धेत बिहारचाही संघ खेळायला येणार आहे. जो जिता वही सिकंदर. पण सिकंदर बनण्याचे गुपित कोणी समजू शकले नाही. जे जिंकले त्यांचे अभिनंदन.”Uddhav Thackeray



तेजस्वींच्या प्रचारसभेची गर्दी एआयची होती का?

निकालातील अनाकलनीयतेबद्दल बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या सभांमधील गर्दीचा मुद्दा उपस्थित केला. “निवडणुकीत तेजस्वीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती. ती खरी होती की एआयची होती हे कळायला मार्ग नाही. ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते, त्याचं सरकार येत नाही. पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या, त्यांचं सरकार येतं, हे कळण्याच्या पलिकडचे आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

बहुमतानंतरही नेता निवडायला वेळ लागतो

बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी विलंब होत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यावरून भाजपला टोला लगावला. “बहुमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर (मागील निवडणुकीत) नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला होता,” असे ते म्हणालेत. दहा हजार रुपये दिल्यामुळे काही फरक पडला असेल, पण लोक रोज जे भोगत आहेत ते त्यांच्या मनातून अजून जात नाही, असे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह : ‘लोकशाही मानायची का?’

बिहारमधील निकालासोबतच, ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याच्या जुन्या मुद्द्याची आठवण करून दिली. “हे अनाकलनीय गणित आहे. त्यावेळी (मागील काळात) मुद्दा उचलला होता की मतदार यादीतून ६५ लाख नावं वगळली. ती परत घेतली की नाही माहीत नाही. आम्ही मोर्चा काढला. दुबार नोंदणी, बोगस पत्त्यावर आम्ही बोललो. पण निवडणूक आयोग काही बोलत नाही. ढिम्म आहे. त्यामुळे या प्रक्रियेला लोकशाही मानायची का? आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक लोकशाहीचा जीव आहे. पण असा प्रकार मानायचा का? निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला.

Uddhav Thackeray Bihar Election Tejaswi Rally AI Crowd Unbelievable Result Photos Videos Speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात