विशेष प्रतिनिधी
मुंबई : OBC reservation स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसंना कमी आरक्षण मिळाले आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. या प्रकरणी फेरविचार करावा अन्यथा कोर्टात जावू, असा इशारा त्यांनी दिला आहे.OBC reservation
राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. या निवडणुकापूर्वीच ओबीसी महासंघाने हा आरोप केलाय.OBC reservation
नेमके प्रकरण काय?
निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात महापालिका क्षेत्रास ओबीसींसाठी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी जागांची मोजणी करताना अपूर्णांक दुर्लक्षित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एका ओबीसी जागांचे नुकसान होते. हाच धागा पकडत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालेला दिसतो आहे.
मुख्यमत्र्यांची भेट घेणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे ओबीसींचे नुकसान होते आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा कोर्टात जाणार असल्याचा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सोबतच या मुद्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत. एससी, एसटी आरक्षणानुसार अपूर्णांक आल्यास 0.50 व त्यापेक्षा जास्त असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करावे, अशी मागणीही त्यांनी केलीय. आता यावर राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.
अशी होतेय निवडणूक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी होईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल.
असे आहे आरक्षण
नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी कोकणात 17, नाशिक 49, पुणे 60, संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55 ठिकाणी निवडणूक होतेय. त्यात एकूण 246 नगरपरिषद असून, 4 नगरपंचायती आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 3,820 प्रभाग आहेत, तर 6,859 जागा आहेत. यातील 3,492 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी जागा 895, अनुसूचित जमातींसाठी जागा 338, तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा राखीव आहेत.
मतदारांचे नाव शोधणे सोपे
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधणे सोपे झाले आहे. त्यासाठी https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच येथे नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App