Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

Sharad Pawar Group

वृत्तसंस्था

मुंबई : Sharad Pawar Group  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.Sharad Pawar Group

ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचा थेट आणि उघड फायदा भाजपला मुंबईसारख्या अत्यंत स्पर्धात्मक निवडणुकीतमतांचे विभाजन म्हणजे विरोधकांची तुकडेबाजी म्हणजे आणि अवाजवी अहंकारामुळे घेतलेल्या एकतर्फी भूमिकेमुळे भाजपला सोन्याची संधी मिळणार, हे वास्तव कोणत्याही राजकीय विश्लेषकाला स्पष्ट आहे, असे मातेले म्हणाले.Sharad Pawar Group



महाविकास आघाडी एकत्र राहिल्यासच मजबूत पर्याय उभा राहतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशावेळी काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय म्हणजे विरोधी मतांची विभागणी भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा मुंबईकरांच्या हिताचे प्रचंड नुकसान होईल, असे शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे.

बिहारचा धडा विसरलेली काँग्रेस

बिहारमध्ये विरोधक विखुरले आणि सत्ताधाऱ्यांना सरळ बहुमत मिळाले. महाविकास आघाडी तुटली की परिणाम किती घातक होऊ शकतात, याचे ताजे उदाहरण बिहार आहे. मुंबईतही तेच चित्र निर्माण करण्याची भीषण चूक काँग्रेसच्या नेतृत्वाकडून होताना दिसते. आघाडीतील विश्वास, संवाद आणि सन्मान या तीनही गोष्टींना काँग्रेसच्या निर्णयाने धक्का बसला आहे. काँग्रेसमधील काही नेते गेल्या काही दिवसांत असमंजस भूमिका, आघाडीविरोधी वक्तव्ये आणि भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल असे निर्णय घेताना दिसत आहेत. म्हणूनच हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसच्या ठराविक गटांनी पक्षाला कमकुवत करण्याची, आघाडी तोडण्याची आणि भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली आहे का? हा प्रश्न फक्त राजकीय नाही. हा मुंबईकरांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे, असा घणाघात अमोल मातेले यांनी काँग्रेस नेत्यांवर केला.

शरद पवार पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट

आमची भूमिका ठाम आणि पारदर्शक आहे. मतांचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत टाळणे, महाविकास आघाडीची एकता टिकवणे, तीनही पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय वाढवणे आणि भाजपच्या विभाजनकारी कारभाराला रोखणे, यासह मुंबईकरांचा हितसंबंध हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्ण बांधिलकीने उभे आहोत, असेही अमोल मातेले यांनी म्हटले.

काँग्रेसने निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा

काँग्रेसचा घेतलेला निर्णय घाईघाईत, भावनिक प्रतिक्रिया म्हणून, राजकीय वास्तवापासून पूर्णपणे दूर असा वाटतो. मुंबईकरांच्या हितासाठी, विरोधी मतसंघटन मजबूत ठेवण्यासाठी आणि भाजपच्या वाढत्या राजकीय आक्रमणाला रोखण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय तात्काळ पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे. मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधिल आहे, असे अमोल मातेले यांनी म्हटले.

Sharad Pawar Group Congress BMC Solo Question BJP Supari Photos Videos Statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात