बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका फुटण्याला सुचली पश्चात बुद्धी!!, असंच म्हणायची वेळ पवार काका – पुतण्यांच्या प्रतिक्रियांवरून आली.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित महागठबंधनचा दणकून पराभव झाला. महाराष्ट्राचा निकाल तिथे रिपीट झाला विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याइतपतही लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला आमदार निवडून आणता आले नाहीत. काँग्रेसची सुद्धा तिथे मोठी अब्रू गेली.
पण या निवडणुकीची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंधच आला नाही. तिथे त्यांनी निवडणूक लढविली नाही उमेदवार उभे केले नाहीत. प्रचाराला जायचा प्रश्नच उद्भवला नाही. कारण पवारांना तिथे कुठल्या पक्षाने प्रचारासाठी बोलवलेच नाही. पण तरीदेखील बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया द्यायची खासदार सुप्रिया सुळे यांनी घाई दाखवली.
– महिलांच्या 10000 रुपयांवर पराभवाचे खापर
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल संपूर्ण हाती आल्यानंतर शरद पवारांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी सरकारी खर्चाने निवडणुका लढविण्याविषयी चिंता व्यक्त केली बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने मुख्यमंत्री महिला योजनेखाली दीड कोटी महिला मतदारांच्या खात्यात प्रत्येकी 10000 रुपये भरले. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. महिलांनी भाजप आणि जनता दल युनायटेड यांना भरभरून मते दिली म्हणून त्यांचा विजय झाला, असे शरद पवार म्हणाले. पण त्यापुढे जाऊन पवारांनी वेगळीच मखलाशी केली. सरकारी तिजोरीतून खर्च करून निवडणुका लढवून विजय मिळवणे कितपत योग्य आहे??, त्यावर निवडणूक आयोगाने नियंत्रण आणायला नको का??, असे सवाल केले. निवडणूक आयोगाने खरं तर यावर नियंत्रण आणायला हवे होते, पण सगळी सरकारी यंत्रणाच त्यांची आहे, असे टीकास्त्र शरद पवारांनी सोडले.
– शरद पवार “तेव्हा” नव्हते बोलले
शरद पवारांनी सोडलेल्या टीकास्त्रातून त्यांची पश्चात बुद्धीच दिसून आली. ज्यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री महिला योजना जाहीर करत होते, त्यावेळी शरद पवारांनी त्या योजनेला विरोध केला नव्हता. नितीश कुमार यांनी महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10000 रुपये भरले, तेव्हा सुद्धा शरद पवारांनी त्याच्या विरोधात जाऊन प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नव्हती, पण निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी 10000 रुपयांविषयी तक्रारी सुरू केल्या. शरद पवारांनी महागठबंधनच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री महिला योजनेवर फोडले. महागठबंधन मधील भांडण वर शरद पवारांनी चकार शब्द उच्चारला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे उमेदवारही दिले नव्हते, याविषयी पवार काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त मुख्यमंत्री महिला योजनेतल्या 10000 रुपयांच्या मुद्द्यावर टीकास्त्र सोडले, यातूनच शरद पवारांची पश्चात बुद्धी दिसून आली.
– अजितदादांना डावलून निवडणूक लढवायचा निर्णय
बिहारमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नसली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र स्वबळावर निवडणूक लढविली होती तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 16 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण अजित पवार त्यांच्या प्रचाराला गेले नव्हते. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळून सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले. या पराभवावर अजित पवारांनी पश्चात बुद्धीने वेगळेच आणि अजब उत्तर दिले.
– प्रफुल्ल पटेल यांच्या डोक्यावर पराभवाचे खापर
शरद पवारांनी बिहार मधल्या पराभवाचे खापर पश्चात बुद्धीने महिलांना दिलेल्या 10000 हजार रुपयांवर फोडले, तर अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचे खापर प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या निर्णयावर फोडले. अजित पवारांना म्हणे बिहारमध्ये 16 उमेदवार घड्याळ चिन्हावर उभे राहिल्याचे माहितीच नव्हते. कारण त्यांनी स्वतःच पत्रकारांशी बोलताना तसा दावा केला. बिहारमध्ये उमेदवार उभे करू नका असे मी सांगितले होते. परंतु प्रफुल्ल पटेल यांनी परस्पर तिथल्या स्थानिक नेत्यांची बोलून निर्णय घेतला आणि 16 उमेदवार उभे केले ते मला माहितीच नव्हते मी त्यावेळी महाराष्ट्रात होतो, असे अजब उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे “राष्ट्रीय अध्यक्ष” असलेल्या अजित पवारांनी दिले.
थोडक्यात अजित पवारांनी बिहारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचे सगळे खापर प्रफुल्ल पटेल आणि बिहार मधल्या स्थानिक नेत्यांच्या डोक्यावर फोडून ते मोकळे झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App