काँग्रेस लवकरच फुटेल, मोदींचे भाकीत; पण ती फोडणार कोण आणि केव्हा??

Modi prediction

सध्याची काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली आहे. काँग्रेसच्या नामदारांचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेस मधल्या अनेक नेत्यांना आवडत नाही. त्यामुळे लवकरच काँग्रेस फुटेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या बिहार विजयी सभेत केले.Who will break the Congress again??, as per Modi prediction

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाकीत केल्यामुळे त्याला कितीही राजकीय वास आला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मोदींनी कुठलीही ठोस माहिती हाताशी असल्याशिवाय काँग्रेस फुटण्याचे धाडसी वक्तव्य केलेले नाही. म्हणूनच वर उल्लेख केलेला सवाल समोर आला आहे, तो म्हणजे काँग्रेस फुटणार असेल, तर ती फोडणार कोण आणि केव्हा??



– काँग्रेसच्या फुटीचा इतिहास

तशी काँग्रेस अनेकदा फुटली. स्वतः इंदिरा गांधींनीच दोन वेळा म्हणजे 1969 आणि 1978 या वर्षांमध्ये काँग्रेस फोडली. स्वतःची स्वतंत्र काँग्रेस अस्तित्वात आणि सत्तेवर आणली. त्यानंतर 1991 मध्ये थोड्याच दिवसांसाठी नारायण दत्त तिवारी आणि अर्जुन सिंग यांनी काँग्रेसकडून स्वतःची तिवारी काँग्रेस काढली होती. पण 2025 पूर्वी मोठ्या प्रमाणावर काँग्रेस दोनदा फुटली होती, ती 1998 मध्ये आणि 1999 मध्ये. 1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याच्या विरोधात तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांना हाताशी धरून काँग्रेस फोडली होती. पण हे दोन बडे नेते सोडल्यास पवारांच्या हाताला काँग्रेसमध्ये दुसरे कुठले मोठे नेते लागले नव्हते. 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस फोडून स्वतःची तृणमूल काँग्रेस काढली आणि तिला पश्चिम बंगालमध्ये 2025 पर्यंत सत्तेवर ठेवले. शरद पवार आणि ममता बॅनर्जी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसलाच पोखरले आणि स्वतःचे पक्ष वाढविले.

– शशी थरूर काँग्रेस फोडणार??

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाकीत केल्याप्रमाणे खरंच काँग्रेस फुटणार असेल, तर एकच नाव सध्या समोर येते ते म्हणजे शशी थरूर यांचे. कारण शशी थरूर यांनी गेल्या साधारण वर्षभरापूर्वीपासून काँग्रेसच्या गांधी घराण्याच्या विरोधात पक्षांमध्ये राहूनच आवाज उठविला. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पदाची निवडणूकही लढविली. ते केरळ मधून काँग्रेसचे खासदार असले तरी गांधी घराण्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर काँग्रेसने त्यांचे महत्त्व एकदम कमी करून टाकले. त्यांना “मोकळे” सोडले. कदाचित मोदींच्या भाकिताप्रमाणे केरळ विधानसभा निवडणुकीच्या आधी शशी थरूर काँग्रेस फोडून केरळ पुरता स्वतःचा प्रादेशिक पक्ष काढू शकतील.

पण काही झाले तरी शशी थरूर हे काँग्रेस फोडणाऱ्या संभाव्य नावांमध्ये उघड असलेले नाव आहे. पण पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकूण कार्यशैली पाहता त्यांनी आत्तापर्यंत नेहमीच political surprise element देशाला दाखविले. त्यानुसार काँग्रेस मधला एखादा वेगळाच नेता जो सध्या उघडपणे गांधी परिवाराच्या विरोधात बोलत नाही किंवा कुठली कारवाई करत नाही, तोच नेता काँग्रेस फोडायला बाहेर आला, तर नवल वाटायला नको. कारण त्यातच मोदींचे political surprice element दडलेले असू शकते.

– बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी अस्वस्थ

पश्चिम बंगाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले माजी गटनेते अधीर रंजन चौधरी अस्वस्थ आहेत. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना खड्यासारखे बाजूला काढून टाकले. त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणले. त्यामुळे ते राजकारणात पुनरागमन करायची वाट पाहत आहेत. त्यांना “ताकद” देऊन बंगाल मधली उरली सुरली काँग्रेस कुणी फोडली तर आश्चर्य वाटायला नको.

– सचिन पायलट कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट??

2023 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी तिथे काँग्रेस मध्ये प्रचंड अस्वस्थता होती. अशोक गेहलोत यांच्याशी उभा दावा असल्याने सचिन पायलट काँग्रेस मधून बाहेर पडायच्या बेतात आले होते. पण प्रियांका गांधी यांनी त्यांना काँग्रेस मधून बाहेर पडण्यापासून रोखले.‌ पण सचिन पायलट आता पुन्हा अस्वस्थ झालेत का??, त्या अस्वस्थ झाले असतील तर त्याच्यात नव्या अस्वस्थतेची बीजे कुणी पेरली??, हा संशोधनाचा विषय आहे.

– तामिळनाडूत चिदंबरम पिता – पुत्र अस्वस्थ

तामिळनाडूत चिदंबरम पिता – पुत्र अस्वस्थ झालेत. त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या केसेस मधून सुटायचे आहे. त्यामुळे ते अजूनही मोदी सरकारला अनुकूल मते व्यक्त करतात. तमिळनाडू काँग्रेसला ठोसे मारत राहतात. मग चिदंबरम पिता – पुत्रांची अस्वस्थता वाढवून तामिळनाडू उरली सुरलेली काँग्रेस गुंडाळायचा बेत सुरू आहे का??, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

– फुटण्यासाठी खतपाणी

पण ते काहीही असो, ज्या अर्थी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस फुटायचे भाकीत केले, त्या अर्थी काहीही करू काँग्रेस फुटणार. ती फुटावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणांहून भरपूर “खतपाणी” घातले जाणार. अनेक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलवल्या जाणार आणि त्यांच्या विझवल्या जाणार हे मात्र निश्चित!!

Who will break the Congress again??, as per Modi prediction

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात