विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्याची काँग्रेस ही मूळची काँग्रेस उरली नसून ती मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली आहे. बिहार मधल्या पराभवानंतर ती आणखी एका फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. काँग्रेस लवकरच फुटेल, अशा शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज काँग्रेसमध्ये पाचर मारली. Congress split again
बिहारमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय नेहमीप्रमाणे दिल्लीच्या भाजप मुख्यालयात विजय उत्सव साजरा करण्यात आला या विजय उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य भाषण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या आणखी एका फुटीचे भाकीत वर्तविले.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
– मी अतिशय गांभीर्याने सांगतोय, तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे नामदारांची काँग्रेस बिघडली आहे. सध्याची काँग्रेस ही मूळची काँग्रेस उरलेली नसून ती आता नामदारांच्या नेतृत्वाखाली “मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस” बनली आहे. काँग्रेसमधल्या एका गटाला हे बिलकुल मान्य नाही. त्यांना काँग्रेसच्या नामदारांचे तुष्टीकरणाचे राजकारण आवडत नाही. त्यामुळेच काँग्रेस आज आणखी एका फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. काँग्रेस लवकरच फुटेल. तसे घडले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
– बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातले भांडण लवकरच उघड्यावर येईल. या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना जाहीरपणे शिव्या द्यायला लागतील. काँग्रेस आपल्या मित्रांची मते फोडून स्वतःचे घोडे पुढे दामटते म्हणून काँग्रेसचे मित्र तिला शिव्या द्यायला लागतील.
– बिहारमध्ये प्रचंड विजय मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची ऊर्जा भरली आहे. हीच ऊर्जा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कायम राहील.
– बिहारमध्ये भाजप आणि सगळ्या साथीदारांनी एकत्र येऊन राज्यात जंगल राज येऊ दिले नाही. पश्चिम बंगाल मधले जंगल राज भाजपचे कार्यकर्ते संपवतील. पश्चिम बंगालच्या जनतेच्या पाठीशी आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहू. तिथले जंगल राज संपवूनच दाखवू, असा मी त्यांना विश्वास देतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App