विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या 14 नोव्हेंबरला लागणार आहेत पण ते निकाल येण्याच्या दिवशीच बिहारमध्ये “नेपाळ” आणि “बांगलादेश” घडवायची लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने तयारी केली. तशी धमकीच राष्ट्रीय जनता दलाचे नेते सुनील सिंह यांनी दिली. त्यामुळे बिहार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केला.Lalu’s party is preparing to create “Nepal” + “Bangladesh” in Bihar on the day of the results tomorrow; FIR against the leader who made such a boast!!
बिहार विधानसभा निवडणुकीचे उद्या निकाल आहेत. पण निकालापूर्वीच्या सगळ्या एक्झिट पोल मध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. पण ॲक्सिस माय इंडिया या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल मध्ये राष्ट्रीय जनता दल आणि तेजस्वी यादव यांना बिहारच्या जनतेने पसंती दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत मोठी चुरस आहे.
– सुनील सिंह विरुद्ध FIR
पण हे निकाल लागण्यापूर्वीच तेजस्वी यादव आणि सुनील सिंह यांनी वेगवेगळी वक्तव्ये करून निवडणूक आयोगाला दमबाजी केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निकालामध्ये काही फेरफार केले तर त्यांना सोडणार नाही, असा दम तेजस्वी यादव यांनी दिला, तर बिहारमध्ये “नेपाळ” आणि “बांगलादेश” घडवू, अशी दमबाजी सुनील सिंह यांनी केली. बिहारचा निवडणूक निकाल सत्ताधारी आघाडीच्या बाजूने गेला आणि राष्ट्रीय जनता दलाला अपेक्षित लागला नाही, तर आलाय तो निकाल स्वीकारायचा नाही. त्या विरोधात संपूर्ण राज्यभर हिंसक निदर्शने करायची असाच इरादा यातून स्पष्ट झाला. म्हणून बिहारच्या पोलिसांनी सुनील सिंह यांच्याविरुद्ध ताबडतोब FIR दाखल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App