नाशिक : मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 2017 मध्ये सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिम नगरसेवकांना निवडून आणण्यात आघाडीवर होते. पण आता या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुक्तहिदा मुसलमीन (AIMIM) याने तब्बल 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच ही घोषणा केली.In Mumbai, which elected 31 Muslim corporators from all parties in 2017, Asaduddin Owaisi’s AIMIM party alone will field 50 candidates; Who will be affected
2017 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी शिवसेना अखंड होती आणि भाजप बरोबरच्या युतीमध्ये राज्यात सत्तेवर होती. तेव्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच होते.
मुंबईत 3 नगरसेवक
यावेळी प्रथमच AIMIM हा पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरला होता. पहिल्याच निवडणुकीत या पक्षाने 3 नगरसेवक निवडून आणले होते. काँग्रेसचे 31 न्यू नगरसेवक निवडून निवडून आले होते त्यापैकी 11 मुस्लिम होते. समाजवादी पक्षाचे 6 मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते.
मुस्लिम मतांमध्ये फूट पडण्याचा धोका
पण, 2025 च्या महापालिका निवडणुकांमध्ये AIMIM ए आय पक्षाने तब्बल 50 जागी उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला. कारण मुंबई महापालिका परिक्षेत्रातल्या मुस्लिम बहुल भागात मुस्लिम मतांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली. मुंबई महापालिकेत आधीच शिवसेना आणि भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांचा प्रभाव आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचा प्रभाव मुदलातच घटला आहे. या दोन्ही पक्षांची मतांची जी काही थोडीफार पॉकेट्स उरली आहेत, ती मुस्लिम बहुल भागात आहेत. पण आता AIMIM ए पक्षाने याच मुस्लिम बहुल भागामध्ये 50 उमेदवार दिले, तर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांच्या पॉकेट्सवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते घाबरून राहिलेत.
– ओवैसींची ऑफर काँग्रेसने नाकारली
वास्तविक काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांना AIMIM पक्षाने यापूर्वी युती करायची ऑफर दिली होती. परंतु स्वतःच्या ताकदीवर अति आत्मविश्वास असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ती ऑफर नाकारली होती. त्यांनी ओवैसींच्या पक्षाला एकटे पाडले होते. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या पक्षांनी असदुद्दीन ओवैसी यांचे आवाहन नाकारले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत AIMIM पक्षाने स्वतंत्रपणे उतरायचे ठरवून मुंबईत 50 उमेदवार द्यायचे असा निर्णय जाहीर केला. पण त्यामुळे आता काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोघांच्या पोटात गोळा आलाय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App