विशेष प्रतिनिधी
पुणे : Amol Mitkari पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत बरेच खुलासे केलेत. सोबतच या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी दमानिया यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.Amol Mitkari
जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदे अंजली दमानिया यांनी पुण्यातील पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या महार वतनाच्या जमिनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आता दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देताना मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून दमानिया यांचा समाचार घेतला.Amol Mitkari
जरा 'दमा'न!मालकाकडून जास्त पगार मिळावा म्हणून मागील अनेक महिन्यांपासून अजितदादा आणि पार्थ पवारांवर खुप अभ्यास करावा लागला .इतकाच अभ्यास UPSC साठी केला असता तर आज ही बिनबुडाचे आरोप करणारी 'सुपारीबाज समाजसेवा' आपल्या हातुन घडली नसती. गोळ्या वेळेवर घेत चला .मेंदुची काळजी घ्या.😀 — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 12, 2025
जरा 'दमा'न!मालकाकडून जास्त पगार मिळावा म्हणून मागील अनेक महिन्यांपासून अजितदादा आणि पार्थ पवारांवर खुप अभ्यास करावा लागला .इतकाच अभ्यास UPSC साठी केला असता तर आज ही बिनबुडाचे आरोप करणारी 'सुपारीबाज समाजसेवा' आपल्या हातुन घडली नसती. गोळ्या वेळेवर घेत चला .मेंदुची काळजी घ्या.😀
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 12, 2025
नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी?
जरा ‘दमा’न! मालकाकडून जास्त पगार मिळावा म्हणून मागील अनेक महिन्यांपासून अजितदादा आणि पार्थ पवारांवर खुप अभ्यास करावा लागला, असे मिटकरी म्हणालेत. तसेच इतकाच अभ्यास UPSC साठी केला असता, तर आज ही बिनबुडाचे आरोप करणारी ‘सुपारीबाज समाजसेवा’ आपल्या हातुन घडली नसती, असा टोलाही मिटकरी यांनी लगावला. गोळ्या वेळेवर घेत चला. मेंदुची काळजी घ्या. अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर केली.
दमानियांची अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केलेल्या पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक खुलासे केलेत. या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या व्यवहारातील चौकशी निःपक्ष होण्यासाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली. या व्यवहाराची चौकशी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. चौकशी समितीतील पाच सदस्य पुण्यातील असताना आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, ही समिती निःपक्ष चौकशी करू शकेल का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
नेमके प्रकरण काय?
अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या व्यवहारात केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले. या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळल्याने सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून, तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App