कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण भोवले, महिला पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

Kothrud h

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. कारवाईच्या मागणीसाठी या पीडित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी त्या मुलींच्या उपस्थितीत पोलिसींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला होता.

कोथरूड पोलिस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे,पोलिस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलिस विभागाचे धनंजय सानप, छत्रपती संभाजीनगर चे माजी पोलिस अधिकारी सखाराम सानप यांच्यावर आता गुन्हा दाखल करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी तपास करावा असा आदेश सुद्धा कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, कोथरूड भागात तीन युवतींना जातीवाचक शिविगाळ आणि अश्लिल शेरेबाजी केल्याप्रकरणी कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्यासह आठ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.

वर्दीच्या बळावर बेकायदा वर्तन करणाऱ्या पोलिसांना सरकारने पाठीशी घातलं तरी न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली नाही. याप्रकरणी पिडीत मुलींसह सुजात जी आंबेडकर, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह आम्ही सर्वांनी पोलिस आयुक्तालयात रात्रभर ठिय्या देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. पण न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यात या मुली यशस्वी ठरल्या. याबाबत त्यांचं, त्यांच्या पाठीशी उभं राहणारे ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांचं अभिनंदन!

The case of beating of girls in Kothrud has been stirred up.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात