विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA ने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे. बिहार पुन्हा त्या काळात जाऊ नये, म्हणून आगामी निवडणुकीत एनडीएच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील बाकरपूर विधानसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंह यांच्या प्रचार सभेत बोलताना स्थानिक मतदारांना केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या समवेत त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. Eknath Shinde
एनडीए मधील पाच घटक पक्ष हे पाच पांडव असून, विरोधक म्हणजे कौरव आहेत, त्यामुळे आता निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर या कौरवांचा संहार करा, असे सांगत यावेळी विरोधकांवर हल्ला चढवला.
जे vote chori चा आरोप करतात, त्यांनी त्यांच्या राजकारणात नोट चोरी केली आहे. काँग्रेसने नेहमीच देशाची फसवणूक केली आणि आता हार पत्करण्याची तयारी करत आहेत. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे थियरीत पास, पण प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेत, असे हे लोक आज इतरांना राजकारण शिकवत फिरत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
एनडीए सरकारने मागील काही वर्षांत बिहारमध्ये अब्जावधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना गती दिली आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक कल्याण योजनांवर भर देण्यात आला. महिलांसाठीच्या ‘लाडली योजना’, सामाजिक सुरक्षा व आत्मनिर्भरतेच्या उपक्रमांमुळे बिहारमधील महिलांना नवे बळ मिळाले असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले. त्यामुळे बिहारला विकासाच्या मार्गावर घेऊन जायचे तर पुन्हा एकदा राज्यात डबल इंजिन सरकारला संधी द्यावी लागेल असे याप्रसंगी नमूद केले.
यावेळी भाजपचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जे.पी.नड्डा, अजय यादव, वीरेंद्र पटेल, बाबू साहेब, पप्पू कुशवाहा, रमेश पासवान, श्रीमती प्रभावती देवी, नागेंद्र मिश्र, संजय कुमार सिंह तसेच एनडीए मधील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि बिहारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App