नाशिक : 1 रुपयाही न घेता शीतल तेजवानीचा पार्थ पवारच्या कंपनीशी 300 कोटींचा व्यवहार; की पार्थला 42 कोटी रुपये शुल्क भरावे लागू नये म्हणून यंत्रणांची दिशाभूल करायचाच प्रकार??, असा सवाल हे कोरेगाव पार्क/ मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात समोर आलाय. कारण हे सगळे प्रकरण अंगलट आल्यानंतर देखील अजितदादांनी पार्थची पाठराखण केली. तो “फक्त चुकला” असे ते म्हणाले. मी त्याच्याशी बोलेन. तो अनुभवातून शिकेल. तो पुन्हा अशी चूक करणार नाही, अशी मखलाशी त्यांनी केली.
पण या सगळ्या व्यवहारात 1 रुपया सुद्धा दिला गेलेला नाही, असे अजितदादा वारंवार सांगत राहिले. यामागचे नेमके राजकीय आणि आर्थिक “रहस्य” काय??, हा सवाल समोर आला.
तर हे “रहस्य” असे की,
शीतल तेजवानीने फक्त शब्दांवर विश्वास ठेवून म्हणे 1 रुपया सुद्धा न घेता पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीशी 300 कोटी रुपयांचा व्यवहार केला. खरेदी खत केले.
पण संबंधित व्यवहार रद्द केल्याचे अजित पवारांनी परस्पर जाहीर केले. स्वतः पार्थ पवारने तशी घोषणा आणि कृती दोन्ही केलेले नाही. त्यांनी निबंधक कार्यालयात फक्त अर्ज दाखल केला.
पण प्रत्यक्षात व्यवहार रद्द करायचा तर पार्थ पवारांना 42 कोटी रुपये शुल्क भरावे लागेल. ते भरल्यानंतरच निबंधक कार्यालय व्यवहार रद्द करायला मान्यता देऊ शकेल. मात्र त्यासाठी शीतल तेजवानी आणि पार्थ पवार तसेच अमेडिया कंपनीचा 1 % पार्टनर हे एकत्र निबंधक कार्यालयात हजर राहावे लागतील.
पण 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी फरार झाल्याच्या बातम्या आल्यात. पोलीस तिचा शोध घेत आहेत. पण तिचा ठाव ठिकाणा अजून लागलेला नाही. अजित पवार तिच्यावर काहीही बोलले नाहीत. पण अजित पवारांनी जाहीरपणे सांगून देखील कोरेगाव पार्क जमिनीचा व्यवहार रद्द झालेला नाही. कारण शीतल तेजवानी समोर आलेलीच नाही.
या व्यवहारात 1 रुपया सुद्धा दिला गेलेला नाही, असे अजित पवार वारंवार सांगत आहेत. हे पार्थला 42 कोटी रुपये शुल्क भरावे लागू नये, यासाठी सांगत आहेत??, की शीतल तेजवानी समोर येणारच नाही, अशी त्यांना खात्री आहे, म्हणजेच व्यवहार रद्द होणार नाही, याची खात्री आहे, म्हणून सांगत आहेत, हा यातला कळीचा मुद्दा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App