Radhakrishna Vikhe Patil : आधी सोसायटी काढायची,मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

Radhakrishna Vikhe Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Radhakrishna Vikhe Patil  भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं, हे वर्षानुवर्षं सुरू आहे, असं विधान विखे पाटील यांनी केल्याने शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.Radhakrishna Vikhe Patil

सोशल मीडियावरही त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विखे पाटील यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली असून, किसान सभेचे नेते अजित नवले यांनी त्यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे. विखे पाटील शेतकऱ्यांना दोष देत आहेत, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणांचे फळ आहे, असा हल्लाबोल नवले यांनी केला. ते म्हणाले, सरकार आयात-निर्यात धोरणांमध्ये सातत्याने बदल करत आहे, त्यामुळे बाजारातील भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. शिवाय, पीक विमा कंपन्यांचे नफे वाढवले जातात, पण शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.Radhakrishna Vikhe Patil



मंत्री बावनकुळेंकडून सारवासारव

दरम्यान, या वादावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सारवासारव केली. त्यांनी सांगितलं की, विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता. त्यांना म्हणायचे की शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ व्हावे आणि भविष्यात पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर निर्माण होऊ नये, याची खबरदारी घ्यावी.

Radhakrishna Vikhe Patil Controversial Statement Farmer Loan Waiver Loan Society

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात