विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Gopichand Padalkar राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सध्याची राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील सहा महिन्यांत संपत आहे, परंतु त्यांच्या या सदस्यपदाची चिंता चक्क भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लागून राहिली आहे. पवार कुटुंबावर सातत्याने टीका करणारे पडळकर यांनी, 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असे म्हणत शरद पवार यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य करत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. शरद पवार यांनी 2019 मध्ये राज्यसभेतून खासदारकी स्वीकारली होती.Gopichand Padalkar
माळशिरस येथील पाणीवमध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांची खासदारकी 2026 मध्ये संपत असताना आता ते पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार? केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही. त्यामुळे मला त्याची काळजी पडली आहे.Gopichand Padalkar
पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातच पवारांचे तुतारीवाले आमदार सर्वाधिक आहेत, पण तुतारीवाले सातत्याने भाजपच्या संपर्कात असतात आणि भेटीगाठी करत असतात. तुतारीवाले आमदार नेमके कुठे असतात हे तुम्हालाच माहित नाही. त्यामुळे शरद पवारांची 2026 मध्ये खासदारकी कशी येणार असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे पडळकर म्हणाले.
पंढरपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
पंचायत राज निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आलेले दिसत आहेत. शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, काँग्रेसचे भगीरथ भालके, अजित पवार गटाचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश साठे आणि मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी एकत्र येत भाजपविरोधी मोट बांधली आहे. सत्ताधारी भाजपचे आजी-माजी आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या विरोधात विरोधकांसह महायुतीतील मित्रपक्षही एकत्रित आल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App