विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे यांनी प्रथमच धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. या कटासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा आरोप देखील केला. या प्रकरणी जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला. Manoj Jarange
– मनोज जरांगे म्हणाले :
कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी कालच मराठा समाजाला आवाहन केला आहे की, आपण शांत राहायचं आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा. अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती.
राज्यातल्या मराठा समाजाला माझं सांगणं आहे की, जितके मराठा समाजाचे राज्यातील नेते आहे त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. ओबीसीचे नेते, हिंदू मुस्लिमांच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. आज माझ्यावर वेळ आली आहे म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आली की आम्ही मजा बघायची हे नको. कोणाचं तरी ऐकून एखाद्याच्या जीवावर उठायचं. करणाऱ्या पेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार आहे. आज माझ्यावर बितली उद्या तुमच्यावरही बितू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घ्या. आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार आहे.
मनोज जरांगेंनी सांगितला घटनाक्रम
100 एक जण बीड आणि जालना जिल्ह्यातले सर्व पक्षाचे लोक असलेले होते. त्यामुळे जनतेच्या प्रशासनात खरं काय आहे ते सर्वांना माहिती आहे. बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए आहे. तो या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचे आहे आणि इथून सुरुवात झाली. पहिले त्यांच्याकडून खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचं ठरलं होतं. मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले की यांचा खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावर आले की, आपण गोळ्या किंवा औषध घेऊन मग घातपात करू.
– बीडचा कांचन पाटील नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचनाचे काम केले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले. तिथे एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडे यांनी सोडली आणि यांच्याकडे गेले. त्यांची वारंवार धनंजय मुंडेंशी भेट व्हायची. कांचन पाटील आणि धनंजय मुंडे यांची 20 मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही. नीच राजकारण करून तो मोठा होणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App