नाशिक : अमेडिया कंपनीच्या 99 % च्या मालकावर गुन्हा दाखल नाही; पालकमंत्री पित्याला घोटाळ्याची म्हणे माहितीच नाही, पण आजोबांनी “कवडीमोल” ठरविलेल्या नातवाने 300 कोटी तरी आणले कुठून??, असला प्रकार आणि हा सवाल आता कोरेगाव पार्क मधल्या 40 एकर जमीन घोटाळ्यात समोर आलाय. Parth pawar
– पार्थ वर गुन्हाच दाखल नाही
पार्थ पवारांच्या ज्या अमेडिया कंपनीने 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन फक्त 300 कोटी रुपयांना खरेदी करून त्याची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये भरली, त्या पार्थ पवार आणि विरुद्ध गुन्हा दाखल नाही. अमेडिया कंपनीचा 1 % मालक दिग्विजय पाटील याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या अमेडिया कंपनीची 99% मालकी पार्थ पवारची आहे. गेल्या चार महिन्यांपासून सगळा व्यवहार सुरू असताना अजित पवारांच्या कानावर काही बाही आले, त्यावेळी त्यांनी काही चुकीचे करू नका, असा म्हणे सल्ला दिला. पण त्यानंतर त्यांना काही माहितीच नाही असे सांगून त्यांनी स्वतःच कानावर हात ठेवले. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना आपल्या मुलाच्या व्यवहाराची किंवा गैरव्यहाराची काही माहितीच नाही, असे अजित पवारांच्या वक्तव्यातून समोर आले. Parth pawar
– अजितदादा संशयाच्या घेऱ्यात
अजित पवारांच्या या वक्तव्यावर अण्णा हजारे, अंजली दमानिया, अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी टीकेची झोड उठवली. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याची जबाबदारी अजितदादांचीच असल्याची ठाम भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली. जमीन घोटाळे बाकीच्यांना अडकवून पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा डाव रचल्याबद्दल अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी फडणवीस सरकारला घेरले.
– 300 कोटी रुपयांचा सोर्स आणि मार्ग काय??
पण या सगळ्या प्रकारात एक महत्त्वाची बाब मात्र विसरली गेली ती म्हणजे खुद्द शरद पवारांनी कवडीचीही किंमत न दिलेल्या नातवाने जमीन खरेदीसाठी 300 कोटी रुपये तरी आणले कुठून??, हा सवाल फारसा कुणी विचारलाच नाही. एक तर 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन तिथल्या वहिवाटदार महार वतनदारांची नावे हटवून मुंबई सरकारने आधीच आपल्या ताब्यात घेतली. मग ती जमीन परस्पर कुलमुखत्यारपत्रे तयार करून शीतल किशनचंद तेजवाणीने पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीला विकली. पण या जमीन व्यवहारासाठी पार्थ याने 300 कोटी रुपये तरी आणले कुठून??, हा सवाल समोर आला. कारण याच पार्थ पवारला शरद पवारांनी आम्ही कवडीचीही किंमत देत नाही असे म्हटले होते मग सार्वजनिक जीवनात कवळीची ही किंमत नसणाऱ्या आणि फक्त एक लाख रुपये भाग भांडवल असणारी कंपनी चालविणाऱ्या पार्थने 300 कोटी रुपये केव्हा आणि कसे गोळा केले??, त्याचे सोर्सेस आणि मार्ग काय होते??, या संदर्भात चौकशी होण्याची गरज आहे.
– देवेंद्र फडणवीसांकडून उत्तर अपेक्षित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी या प्रकरणात लक्ष घालून ज्या चौकशीचे आदेश दिले त्या चौकशीच्या कक्षेमध्ये पार्थ पवारने 300 कोटी रुपये तरी कुठून गोळा केले??, ही बाब आहे का??, हा कळीचा सवाल आहे. सवालाचे उत्तर अजून तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही. ते लवकरात लवकर मिळण्याची अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App