Parth Pawar : 1800 कोटींची 40 एकर जमीन पार्थ पवारांना 300 कोटींत विक्री, कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन व्यवहारावर विरोधकांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे : Parth Pawar  bउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या अमेडिया नावाच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतनाची ४० एकर जमीन, ज्याच्यावर शासनाची मालकी नोंद आहे, ती शासनाची परवानगी न घेताच खरेदी केली. शिवाय २१ कोटीची स्टँप ड्युटीही माफ करून घेतल्याचे समोर आले आहे. ही जमीन बोटॅनिकल गार्डनसाठी राखीव आहे, असेही म्हटले जाते. बाजारभावानुसार सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांतच हडपण्यात आली, असा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशी समिती नेमली असून पुण्यातील तहसीलदार सुर्यकांत येवले तसेच सह दुय्यम निबंधक तारु यांना निलंबित (सस्पेंड) करण्यात आले. पार्थ यांनी मात्र आपण काहीही चुकीचे केले नाही, असे म्हटले आहे. विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करताच ते म्हणाले की, माझा याच्याशी संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली हे योग्यच आहे. तो त्यांचा अधिकार आहे. तर निलंबित तहसीलदार येवलेंनी दावा केला की, त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.Parth Pawar



बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, गुरुवारी रात्री अमेडिया कंपनीचे भागिदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्री प्रकरणात कुलमुख्त्यारपत्र असणारी महिला शीतल तेजवाणी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पार्थ वगळण्यात आले. मात्र, पार्थ यांची चौकशी करून पुढील कारवाई होईल, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला.

कंपनीचे भांडवल लाखाचे, पण व्यवहार ३०० कोटींचा

भागभांडवल अवघे १ लाख रुपये असूनही अमेडियाने सुमारे १८०० कोटी बाजारमूल्याच्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी केली. त्यावर आयटी पार्क, डेटा सेंटर उभारणीची तयारीही केली. २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडियाने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने २१ कोटींऐवजी फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी लावली. २७ दिवसांत हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल हाेतील. तातडीने जमीन खरेदी व्यवहार रद्द होऊ शकतो. चौकशी समितीच्या फेऱ्यात पार्थ पवारांना घेतले जाऊ शकते. भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसेंचे मंत्रीपद अशाच जमीन प्रकरणातच गेले हाेते. त्यामुळे अजित पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते.

वडेट्टीवार, दमानियांचा आरोप

काँग्रेसचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कांबळे, ढोलेंच्या नावे सातबारा असलेली जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी फक्त कायदेशीर कारवाईसाठी दिली गेली, विक्रीसाठी नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून पारदर्शक चौकशी केली तर पुण्यात १ लाख कोटींचा घोटाळा उघड होईल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची इडीतर्फे चाैकशी झाली पाहिजे.

Parth Pawar Koregaon Park Land Purchase Scam Allegations Inquiry | VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात