Bacchu Kadu : सरकारने तारीख देऊन शेतकऱ्यांना फसवल्यास आंदोलन; कर्जमाफी न केल्यास 1 जुलैला रेल रोको आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा

Bacchu Kadu

विशेष प्रतिनिधी

पुणे : Bacchu Kadu  आमच्या आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा आणि ३० जूनची तारीख अशा दोन्ही गोष्टी करून घेतल्या आहेत. सरकारची आता खरी कसरत असून आपण फसलो नसून स्वत:च सरकार फसले आहे. त्याच्या तारखेमुळे ते अडचणीत आले आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान, कर्जमाफी न केल्यास एक जुलैला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.Bacchu Kadu

शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नागपूर येथे हजारो शेतकऱ्यांची एकजूट केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकरी एकता झिंदाबाद चिंतन बैठक पुण्यातील गांजवे चौकातील पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे गुरुवारी (६ नोव्हेंबर) घेण्यात आली होती त्या वेळी कडू बोलत होते.Bacchu Kadu



या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, फीनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे, शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे, स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले की, आमच्या एकूण २२ मागण्या होत्या. त्यामुळे चर्चेतून प्रश्न काढणे गरजेचे होते. आंदोलन करताना सरकारवर दबाव महत्त्वाचा असतो. मात्र, पाऊस, कोर्टाच्या अडचणी आणि पोलिसांनी केलेल्या जिल्हा नाकेबंदीमुळे आम्ही चर्चेसाठी गेलो होतो. कर्जमाफी करताना चालू वर्षी झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला असताना त्यांची कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसता. त्यामुळे पुन्हा ते शेतकरी वंचित राहिले असते, म्हणून ३० जूनची तारीख घेतली आहे. परंतु सरकारने ३० पर्यत सरकार कर्जमाफी केली नाही तर एक जुलैला रेल्वे रोको करण्यात येईल.

हे सरकार जनतेच्या रेट्यापुढे घाबरते : महादेव जानकर

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, हे सरकार जनतेच्या रेट्यापुढे घाबरते. म्हणून आंदोलनकर्त्यांना कोर्टाच्या नोटिसा देतात. आम्ही फकीर असून कुणालाही भीत नाही. आला तर आडवा केल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर ट्रोल केले जात असले तरी त्याकडे लक्ष देऊ नये. त्यामुळे ३० जूनपर्यंत कर्जमाफी केली नाही तर पुन्हा आंदोलन पेटेल. चर्चेने प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेतली होती. लोकांनी आम्हाला साथ दिली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या या एकाच वेळी पूर्ण होणार : तुपकर

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, आंदोलन सुरू असताना अनेक शेतकरी टीव्हीवर आंदोलन पाहत होते. काही जण आंदोलनस्थळी आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या या एकाच वेळी पूर्ण होणार नसून टप्प्याटप्प्याने मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत. आज सोयाबीन, कापसाच्या दराचा प्रश्न आहे. त्यासाठी भविष्यात पुन्हा मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. शेतकऱ्यांचा आपला सक्रिय सहभाग आंदोलनात असणे अपेक्षित आहे. परंतु तसे झाले नाही.

Bacchu Kadu Warns Rail Roko Protest Farmer Loan Waiver Failure | VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात