Fadnavis ; उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद, ठाकरेंचे विकासावर भाषण दाखवा अन् हजार रुपये मिळवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत.Fadnavis

उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्त्वातील महायुती सरकावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घेण्यासाठी कर्जमाफीसाठी पुढील वर्षी जून महिन्याची तारीख दिली आहे, असे ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत. त्याचा मला आनंद आहे. ते टोमणे मारण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत. तुम्ही मला त्यांनी विकासावर केलेले भाषण दाखवा आणि हजार मिळवा, असे ते म्हणाले.Fadnavis



राज ठाकरेंवरही साधला निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रकार परिषदेवर टीका केली होती. आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली असे ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या टीकेचाही समाचार घेतला. राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे. ते म्हणजे निवडणुका पुढे ढकली. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपक्षेति नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही, असे ते म्हणाले.

स्थानिक निवडणुकांत महायुतीचाच विजय

मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचाच विजय होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या पातळीवर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकच आहोत. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही, तर त्या ठिकाणी निवडणुकीनंतर युती होईल. त्यामुळे या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल.

उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधी पक्षांनी गत दोन-तीन महिन्यांपासून मतचोरी व मतदारयाद्या स्वच्छ केल्यानंतरच निवडणउका घेण्याचा धोशा लावला आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याविषयी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. पण त्यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांची घोषणा केली. यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.

आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले होते, आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ?

जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा… तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, असे ते म्हणाले होते.

Fadnavis Taunt Uddhav Thackeray Marathwada Visit Speech | VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात