नाशिक : सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे, आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र!!, हा राजकीय प्रकार पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादी मधून समोर आला आहे.Pawar uncle nephew may come together for power sharing in local bodies election
– भाजपशी नको युती
महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाली तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी करायचा अधिकार स्थानिक नेतेमंडळींनाच देण्यात आला. परंतु, त्याचवेळी कोणत्या स्थितीत स्थानिक पातळीवर सुद्धा फक्त भाजपशी युती करू नका. बाकी कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी केली तर चालेल, अशा स्पष्ट सूचना शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना दिल्या. या सूचनांमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली तरी चालेल असेच सूचित केले. त्यामुळेच सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे आणि आता सत्तेसाठी पुन्हा येणार एकत्र असेच चित्र समोर आले.
भाजपबरोबर सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी अजित पवार त्यावेळी झाले असताना शरद पवारांनी त्यांना विरोध केल्याचे दाखविले. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या सत्तेच्या वरचळणीला निघून गेले. काका – पुतण्यांमध्ये फूट पडली असे दाखविण्यात ते दोघे “यशस्वी” ठरले. पण काका – पुतण्यांचे राजकीय रहस्य फक्त सत्तेत दडले आहे. बाकी कुठल्याही ठिकाणी दडलेले नाही हे राजकीय सत्य त्यांच्या समर्थकांबरोबरच त्यांच्या विरोधकांनाही पुरते समजलेय.
– अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे ओढा
म्हणूनच स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये फक्त भाजप सोडून बाकी कुठल्याही पक्षाशी युती करायची मुभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना दिली. अर्थातच स्थानिक नेत्यांचा ओढा जास्तीत जास्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जमलेच नाही, तर ते उद्धव सेना किंवा शिंदे सेना यांच्याकडे वळतील अशी “राजकीय व्यवस्था” पवारांनी करून ठेवली. म्हणजेच पुन्हा एकत्र येऊन सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App