नाशिक : मतदार याद्यांवरून करा आरडाओरडा, पण आता निवडणुकीला सामोरे जा!!, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाने अवस्था करून ठेवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 239 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना जी अप्रत्यक्ष घोषणा केली ती महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दिशेनेच गेली सुप्रीम कोर्टानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करा असे आदेश दिलेत याची आठवण राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत करून दिली. यातच अप्रत्यक्षपणे त्यांनी जिल्हा परिषदा महापालिका या निवडणुकांची सुद्धा घोषणा करून टाकली
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकाही होणार
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या की त्यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांची घोषणा होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
त्यामुळेच मतदार याद्यांवरून आरडाओरडा करा, पण आता निवडणुकीला सामोरे जा!!, अशी सगळ्या राजकीय पक्षांची अवस्था राज्य निवडणूक आयोगाने करून ठेवली. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यासंदर्भातल्या चार याचिका फेटाळून त्या निवडणुकांचा मार्ग मोकळा करून ठेवला होता. त्यामुळे निवडणुका रोखण्याचा महाविकास आघाडीतल्या पक्षांचा प्रयत्नही वाया गेला.
जोपर्यंत मतदारांची सुधारित यादी होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. pic.twitter.com/0bhrkXbu9s — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 3, 2025
जोपर्यंत मतदारांची सुधारित यादी होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. pic.twitter.com/0bhrkXbu9s
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 3, 2025
– बहिष्काराच्या बाता
मतदार याद्यांचे शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका नकोत अशी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची फरफट झाली. पण आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना आहे त्या परिस्थितीत सामोरे जाण्याखेरीज त्यांच्यापुढे दुसरा पर्याय देखील उरलेला नाही. महाविकास आघाडी किंवा मनसे यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालायची नुसती भाषा केली, तर त्यांना मिळणाऱ्या छोट्या मोठ्या यशावर सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय राजकीय पक्ष म्हणून त्यांच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न होईल, तो वेगळाच!! त्यामुळे बहिष्कार वगैरे ची भाषा तोंडी ठीक आहे, पण ती कुठल्याच राजकीय पक्षाला परवडणारी नाही.
सत्याचा मोर्चा! लोकशाहीच्या हत्येविरोधातली सत्याची लढाई! pic.twitter.com/9mV4Zq3MtN — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 2, 2025
सत्याचा मोर्चा!
लोकशाहीच्या हत्येविरोधातली सत्याची लढाई! pic.twitter.com/9mV4Zq3MtN
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 2, 2025
– डबल स्टारचा तोडगा
नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांची नोंदणी या विषयावर डबल स्टारचा तोडगा काढला तसा तो जाहीर पण करून ठेवला. ज्यांची नावे मतदार याद्यांमध्ये दुबार आहेत, त्यांच्यापुढे डबल स्टार येतील आणि त्यांनी इतरत्र मतदान केले नसल्याचे हमीपत्र घेऊन त्यांना मतदान करू दिले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने डबल स्टारचा तोडगा काढून आपली मान दुबार मतदाराच्या मुद्द्यातून काढून घेतली. त्यावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांना अजून तरी काही बोलता आलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App