17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

Rohit Arya

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काही विशिष्ट कारणांवरून 17 मुले आणि दोन वृद्धांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. मुलांची सुटका करताना रोहित आर्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचे सांगितले गेले त्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा एन्काऊंटर झाला.Rohit Arya Killed in Encounter

शासनाकडून काही कोटी रुपये येणे असल्याचे यासंदर्भात बोलले गेले परंतु त्याचे कुठलेही तपशील अजून तरी समोर आलेले नाहीत रोहित आर्य कुणाशी तरी संदर्भात बोलणार होता. त्याला तसे बोलायचे असल्यास त्यानेच व्हिडिओ जारी केला होता. परंतु पोलिसांनी त्याचाच एन्काऊंटर केल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे अजून तरी अनुत्तरीत राहिली. रोहित आर्याचे कोट्यावधी रुपये खरंच बुडाले का??, ते कुणी बुडवले??, कशासाठी बुडवले??, या प्रश्नांची उत्तरे आता खुद्द रोहित आर्या याच्या कडून मिळण्याची शक्यता नाही. पोलीस तपासात जे काही बाहेर येईल, ते आता मान्य करावे लागेल.


फ्रंटिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!!


 नेमके झाले काय??

मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत साधारण 17 मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एन्काऊंटर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार ओलीस ठेवलेल्या 17 मुलांची सुटका करतान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली. मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्या याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वेब सिरीजचे शूटिंग

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओत एका वेब सिरिजसाठी ऑडिशन चालू होते. या ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आले होते. सहा दिवसांपासून ऑडिशनची ही प्रक्रिया चालू होती. सकाळी 10.00 वाजता मुले ऑडिशनसाठी जायची. त्यानंतर रात्री आठ वाजता मुले स्टुडिओच्या बाहेर पडायची. त्याआधी दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली जायची. आज मात्र मुले जेवणासाठी बाहेरच आली नव्हती. त्यानंतर 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. मुलांना डांबून ठेवल्याचे समोर येताच सगळीकडे खळबळ उडाली होती. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या स्टुडिओकडे धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन चालू केले होते.

रोहित आर्याकडे होती एअर गन

मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर्याकडे एक एअर गन होती. सोबतच त्याच्याजवळ काही केमिकल्सही होते. मुलांना डांबून ठेवल्यानंतर त्याने एक व्हिडीओ पाठवला होता. मला काही प्रश्न विचारायचे आहेत, असे तो या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. त्याला कोणत्या विषयावर बोलायचे होते हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. रोहित आर्याने मुलांना जाळून मारण्याची धमकी दिली होती.

 एन्काऊंटर कसे करण्यात आले??

पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी आपेल ऑपरेशन चालू केले होते. रोहितसोबत पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी बाथरुमच्या काचा तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलीस आणि रोहित आर्या यांच्यात चकमक झाली. याच चकमकीत रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली. सध्या सर्व 17 मुले सुखरुप आहेत.

Rohit Arya Killed in Encounter

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात