नाशिक : स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या शरद पवारांना आता मात्र क्रिकेटमध्ये कुठल्या मंडळाच्या किंवा असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तींना कशी झाली आहे. त्यांनी स्वतःच हे मत व्यक्त करून क्रिकेट पासून राजकारण अलग करायची भूमिका घेतली आहे. Sharad Pawar
स्वतः पवार भारतीय क्रिकेट नियम मंडळ अर्थात (BCCI) बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (ICC) आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपले नातू रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष केले रोहित पवार सर 2022 पासून एमसीए चे अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
पण आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मात्र इतर कुठल्याही नेत्याला किंवा त्याच्या नातेवाईकाला अध्यक्ष करायची पवारांची तयारी नाही किंबहुना त्याला विरोध आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उतरू पाहत आहे. परंतु, क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणले नव्हते. देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे राजकारण न आणता क्रिकेटच्या हिताचा निर्णय घेतील, अशी “गुगली” टाकणारे वक्तव्य शरद पवारांनी केल्याची बातमी दिव्य मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिली.
– अजिंक्य नाईक विरुद्ध विहंग सरनाईक
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा उतरले आहेत. पवारांना त्यांनाच अध्यक्ष करायचे आहे. परंतु प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक निवडणुकीत उतरला, तर सगळीच गणिते बदलून त्यांना आव्हान निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन पवारांनी चतुराईने क्रिकेटमध्ये राजकारण नको, कुठल्याही मुख्यमंत्र्याने क्रिकेटमध्ये राजकारण केले नाही, तसेच देवेंद्र फडणवीसही राजकारण करणार नाहीत. ते क्रिकेटच्या हिताचा निर्णय घेतील, अशी गुगली टाकली.
– सामना तर होणार
वास्तविक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली. प्रताप सरनाईक यांनी शरद पवारांची सिल्वर ओक मध्ये जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे या निवडणुकीचा राजकीय रंग अधिकच गहिरा झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा सामना आता देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार रंगणार, अशी अटकळ बांधली गेली. या अटकळीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी क्रिकेटमध्ये आता राजकारण नको, अशी शहाजोग भूमिका घेतली. त्यांनी स्वतः क्रिकेटमधली सगळी पदे भोगली. नातवाची सुद्धा क्रिकेटमध्ये सोय लावली. पण, दुसऱ्या कुठल्या नेत्याचा मुलगा क्रिकेटच्या राजकारणात उतरू पाहतोय म्हटल्यावर लगेच क्रिकेटमध्ये राजकारण नको, अशी दुटप्पी भूमिका घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App