विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra SEC राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ वापरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर करण्यासाठी सध्याच्या कायद्यांमध्ये कोणतीही तरतूदच नाही आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे तांत्रिक यंत्रणाही तयार नाही, असे आयोगाने ठणकावून सांगितले आहे. निवडणुका तातडीने घेण्याची मागणी करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनाही आयोगाने एक प्रकारे कायदेशीर आणि तांत्रिक आव्हान स्पष्ट करून, व्हीव्हीपॅट वापरणे ‘सद्य:स्थितीत शक्य नाही’ असा संदेश दिला आहे.Maharashtra SEC
ईव्हीएम वापराची तरतूद २००५ मध्ये कायद्यात करण्यात आली, मात्र व्हीव्हीपॅट वापराबाबत संबंधित अधिनियम (उदा. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८) किंवा नियमांमध्ये कोणतीही तरतूद नाही. विशेष म्हणजे, कायद्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोगाच्या नव्हे, तर राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो.Maharashtra SEC
तांत्रिक अडचण मोठी
निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापर न होण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे बहुसदस्यीय प्रभाग पद्धत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदाराला सरासरी ३ ते ४ मते देण्याचा अधिकार असतो. या पद्धतीनुसार व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेले मतदान यंत्र विकसित करण्यासाठी देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची ‘टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी’ अभ्यास करत आहे. या समितीचा अंतिम अहवाल अजून आलेला नाही. तांत्रिक तपशील निश्चित झाल्याशिवाय व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर करणे शक्य नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App