विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mazi Ladki Bahin Yojana राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी रु. ४१०.३० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाने ३९६० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. यातून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभागप्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा तसेच निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींसाठीच होईल याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.Mazi Ladki Bahin Yojana
दुबार लाभ टाळण्यासाठी दक्षता
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनांतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. वितरित निधीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत आयुक्त, समाजकल्याण आणि इतर संबंधित विभागांना पाठवणे आवश्यक आहे, असेही सांगण्यात आले आहे.
येत्या १८ नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा
राज्यात २ कोटी ४७ लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होत आहे. या योजनेचा लाभ तब्बल २६ लाख अपात्र लाभार्थींनी घेतल्याचे उजेडात आल्यानंतर लाडक्या बहिणींना ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक करण्यात आली आहे. आतापर्यंत बहुतांशी बहिणींनी ई-केवायसी केली असून १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App