विशेष प्रतिनिधी
बीड : Prakash Solanke राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येताच सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अशात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. निवडणूक लढवण्यासाठी नुसता इच्छुक असून उपयोग नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे किती दारूगोळा आहे याची माहिती द्यावी लागेल. निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं, असे प्रकाश सोळंके म्हणाले.Prakash Solanke
प्रकाश सोळंके यांचे हे वक्तव्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भाषणावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Prakash Solanke
नेमके काय म्हणाले प्रकाश सोळंके?
स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना आमदार सोळंके म्हणाले, “माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसं मतदान घेतलं हे त्यांना चांगलं माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबडं कापावं लागतं, कुणासाठी बकरं कापावं लागतं, कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावे लागतं. पण यात तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात.” त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर टीकांची झोड उठली आहे.
‘दारूगोळा’ किती, याची माहिती द्या
इच्छुक उमेदवारांना इशारा देत सोळंके पुढे म्हणाले की, नुसती निवडणूक लढवण्याची इच्छा असून उपयोग नाही. तुमच्याकडे किती दारूगोळा आहे, याची माहिती आम्हाला द्यावी लागेल. फक्त बंदूक दाखवून चालत नाही, तर बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात. माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत. आपण घेतलेल्या अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे.
विधान सभेपेक्षा चारपट काम करावे लागेल
समोरचा माणूस निवडणुकीत 100 रुपये खर्च करणार असेल, तर आपणही 100 रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आपण त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाही. मात्र कुठेही कमी पडता कामा नये. विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागेल, अशा सूचनाही आमदार सोळंके यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App