Eknath Shinde : आगामी निवडणुका महायुतीत लढण्याची भूमिका ठेवा; शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत, एकनाथ शिंदेंचे आपल्या मंत्र्यांना आदेश

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढवण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. तसेच जिथे जुळून येत नसेल, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढण्याचेही आदेश शिंदेंनी मंत्र्यांना दिलेत.Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, उदय सामंत, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम, गुलाबराव पाटील, प्रकाश अबिटकर यांसारखे महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक देखील तपासले.Eknath Shinde



‘महायुती’ अटळ; शेवटचा पर्याय ‘मैत्रीपूर्ण लढत’

एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या ही भूमिका ठेवण्याचे आदेश दिले. शिंदे म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, ज्यात महानगरपालिका देखील आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्याला महायुतीमध्येच लढायच्या आहेत. सर्वत्र महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी. अगदीच जिथे काही जुळून येत नसेल, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करण्याचा विचार करता येईल, अन्यथा महायुती म्हणून एकत्र लढण्यावरच भर असेल.

शिंदेंकडून मंत्र्यांना दिलेल्या जबाबदारीचा आढावा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आजच्या बोलावलेल्या या बैठकीचा उद्देश केवळ निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करणे नव्हता, तर मंत्र्यांनी त्यांच्या जबाबदारीचे किती पालन केले, हे तपासणे हा होता. एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात सर्व मंत्र्यांशी ‘वन टू वन’ चर्चा करून त्यांना विशिष्ट मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. आजच्या या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला. मंत्री दिलेल्या मतदारसंघात किती फिरले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची किती तयारी केली, आणि पक्ष संघटनेसाठी काय काम केले याची माहिती घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

दिल्ली दौऱ्यानंतर मुंबई महापालिकेवर लक्ष

या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी नुकताच नवी दिल्लीचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. याच दौऱ्यादरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना समसमान जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती.

आता एकनाथ शिंदे यांनी महायुतीत एकत्र लढण्याचा स्पष्ट संदेश दिल्यानंतर, मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळतात आणि महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी शिंदे यांची शिवसेना किती जागांवर लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Eknath Shinde Orders Shiv Sena Ministers To Contest Local Polls As Mahayuti Friendly Fight Only Last Resort

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात