विशेष प्रतिनिधी
सातारा : Phaltan फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक-एक नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील, अशा शब्दांत त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. शिवाय या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून बीडच्या न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी मृत डॉक्टरच्या वडिलांनी केली.Phaltan
साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गत गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूसाठी एक पीएसआय आणि घरमालकाचा मुलगा जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असताना मृत डॉक्टरच्या वडिलांनी गंभीर आरोप करत, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.Phaltan
सुरुवातीला मला घटना सांगितलीच नाही
मृत महिला डॉक्टरचे वडील म्हणाले, आमच्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील. सुरुवातीला मला घटनाच सांगण्यात आली नाही, मला तिच्या जवळच येऊ दिले नाही. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देऊन फाशीच झाली पाहिजे.
कुटुंबीय आणि डॉक्टरमध्ये शेवटचे बोलणे काय झाले?
घटना घडण्या अगोदर आम्ही तिच्याकडे एक दिवस गेलो होतो. तिचे माझे शेवटचे बोलणे झाले, तेव्हा ती तुम्ही चांगले राहा, मी चांगली राहते. या भाऊबिजेला घरी येते, असे ती म्हणाली होती. पण आता तीच माझ्यासोबत नाही. माझ्या लेकराला कसे मोठे केले हे मी शब्दात सांगू शकत नाहीअसे सांगताना डॉक्टर महिलेच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
प्रकरण बीड न्यायालयात चालवावे
आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला. आपल्या लेकीचा छळ करणाऱ्या, मग तो कोणताही खासदार किंवा आमदार असो, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, ज्यात महिला अधिकारी असावी. महत्त्वाचे म्हणजे, हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावे, अशी वडिलांची आग्रही मागणी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App