वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा बार फुसका, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धसका!!

नाशिक: अखेर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा बारच ठरला फुसका; पण तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला मोठा धसका!!, अशीच अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. Vasantdada Sugar

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार, अशी नुसती बातमी सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये झळकली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते घाईघाईने पुढे येऊन प्रतिक्रिया व्यक्त करते झाले. रोहित पवार, प्रशांत जगताप या नेत्यांनी लगेच फडणवीस सरकारला धारेवर धरले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे कसे कल्याण करत आहे, पंतप्रधान मोदींनी सुद्धा कशी त्याची स्तुती केली आहे, वगैरे बातम्या या दोघांनी पेरल्या.

पण त्याच वेळी भाजपने आपला मोर्चा बारामती कडे वळविण्याचा “जावईशोध” रोहित पवारांनी लावला. वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे. आधी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्याला टार्गेट केले आणि आता ते पवारांच्या बारामतीला टार्गेट करत आहेत, असा दावा रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर केला. रोहित पवारांनी आणखी बरेच तारे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर तोडले. देवेंद्र फडणवीस शरद पवारांना त्यांच्या 85 व्या वर्षी त्रास देतात हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल, अशी दमबाजी प्रशांत जगताप यांनी केली.



– घाईगर्दीत प्रतिक्रिया

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची नुसती बातमी आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाल्याचे उदाहरण यामुळे उघड्यावर आले. सगळ्यांनी घाई घाईने प्रतिक्रिया व्यक्त करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कशी बेदाग आहे, त्या इन्स्टिट्यूटने शेतकऱ्यांचे कसे कल्याण केले आहे, वगैरे मखलाशा केल्या.

– पण चौकशीचा बारच फुसका

पण प्रत्यक्षात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा बार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुसका ठरविला. सरकार वेगवेगळ्या संस्थांना जे अनुदान देते, त्या अनुदानाचा वापर त्या संस्था कसा करतात, एवढीच माहिती सगळ्या संस्थांकडून सरकारने मागितली आहे. सरकार वसंतदादा इन्स्टिट्यूटला सुद्धा अनुदान देते त्यामुळे त्या अनुदानाचा वापर कसा होतो, एवढ्या पुरतीच इन्स्टिट्यूट कडून माहिती मागविली आहे. यात चौकशी वगैरे काही नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. वसंतदादा इन्स्टिट्यूट विषयी कोणाची तक्रार आलेली नाही. त्यामुळे तिची चौकशी केलेली नाही. पण तक्रार आली तर तिची चौकशी सुद्धा करू, असे फडणवीस म्हणाले.

पण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी होणार एवढी फक्त बातमी आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र भूकंप झाला. इन्स्टिट्यूट मधले सगळे काळे व्यवहार बाहेर पडतात की काय??, त्यात अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे चेले चपाटे अडकतात की काय??, याची त्यांना भीती वाटायला लागली, तीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सगळ्या महाराष्ट्र समोर उघड्यावर आली.

Vasantdada Sugar Institute inquiry foiled

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात