विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Jain पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. जागा विकत घेणारे गोखले बिल्डर्स यांनी ‘नैतिकतेच्या’ मुद्द्यावर या व्यवहारातून माघार घेत असल्याची घोषणा केली असली, तरी करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास, बोर्डिंगचे ट्रस्ट पैसे परत देण्यासाठी बांधील नाहीत. यामुळे बिल्डर विशाल गोखले यांनी दिलेले 230 कोटी रुपये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Pune Jain
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरण गेल्या महिनाभरापासून चर्चेचा विषय ठरले आहे. वादग्रस्त ठरलेल्या या व्यवहारातून आपण आपण माघार घेत असल्याची घोषणा गोखले बिल्डर्स यांनी केली. यासंदर्भात बिल्डर विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. या ई-मेलमध्ये त्यांनी आपले जमा केलेले 230 कोटी रुपये परत मिळावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, आता या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे.Pune Jain
नेमका ट्विस्ट काय?
पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी परत मिळावेत, असा ई मेल विशाल गोखले यांनी केला होता. मात्र, फक्त गोखलेंनी ई मेल करुन हा व्यवहार रद्द होणार नाही. कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यात जो करार झाला होता, त्यानुसार, जर काही कारणास्तव हा व्यवहार रद्द झाला, तर विश्वस्त गोखले यांना पैसे परत देण्यासाठी कायदेशीररित्या बांधील राहणार नाहीत. परिणामी, केवळ गोखले यांनी ई-मेल करून व्यवहार रद्द केल्यास, त्यांचे 230 कोटी रुपये अडकून पडण्याची शक्यता आहे.
धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
या प्रकरणाची सुनावणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे. या सुनावणीत धर्मादाय आयुक्तांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. जर धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचे आदेश देताना, बिल्डर विशाल गोखले यांचे पैसे परत करण्याचेही आदेश दिले, तरच गोखले यांचे 230 कोटी रुपये त्यांना परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ‘धर्मादाय आयुक्त गोखले यांचे पैसे वाचवणार का?’ या प्रश्नाचे उत्तर उद्याच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App