विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केलेCM Fadnavis
मुंबईतील मरीन लाईन्सवर भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान, विरोधकांकडून या कार्यालयाच्या जमिनीवर आक्षेप घेण्यात आला आहे. सदर जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची 99 वर्षे लीजवर घेतलेली आहे. इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेण्यात आली आणि त्यावर आता भाजपचे कार्यालय बांधले जात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. तर प्रशासकाच्या माध्यमातून या जागेसाठी सर्व व्यवहार करून घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.CM Fadnavis
नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबईतील भाजपचे कार्यालय दादरमध्ये आहे. दुर्दैवाने प्रदेशाचे कार्यालय सर्वात लहान होते. कारण त्या काळात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी सगळ्यांनी मिळून उपलब्ध जागेमध्ये ते कार्यालय तयार केले होते. अनेक अडचणी त्या कार्यालयामध्ये असताना देखील त्या कार्यालयातून भाजप पक्षाचा कारभार चालवत होतो. 2014 निवडणुकांवेळी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा 15 दिवस त्या कार्यालयातच होते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या कार्यालयातून अमित शहा निवडणुकांचे संचलन करायचे. मुंबईचा आवडता वडापाव त्या ठिकाणी बसून खायचे आणि त्यावर पूर्ण निवडणूक त्यांनी काढली होती, अशी आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.
अडचणी दूर करून जागा मिळवली
मुंबईत आपल्या प्रदेशाला चांगले कार्यालय मिळाले पाहिजे, अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. त्यासाठी खूप ठिकाणी जागा सातत्याने शोधत होतो. सरकारी जागेच्या मागे न जाता, परवडणारी खासगी जागा मिळेल, अशी जागा शोधण्याच प्रयत्न आमचा चालला होता. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली. अनेक अडचणी या जागेमध्ये होत्या. एक-एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा मिळवली.
काचेच्या घरात राहत नाही, दगड फेकू नका
भाजपने घेतलेल्या या जागेवर काही लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केलेले आहे. त्यांना मी सांगतो की भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे उपर पत्थर फेकने का प्रयास मत करो, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला. आपण ज्यावेळेसे कार्यालयासाठी जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत. रोज ते प्रश्न विचारतील. त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोज सांगितले की, सरकारी जागा नको. जी जागा असेल, ती विकत घेऊ. विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम आपण पाळू. आपल्याला एकाही नियमात सूट नको, एकही शॉर्टकट नको. सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने करूयात. एखाद्या सामान्य माणसाने, एखाद्या बिल्डरने प्लॉट घेतला, तर त्याला जे जे करावे लागेल, ते सगळे भाजप या ठिकाणी करेल, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
जागा बळकावण्याऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये
आम्ही सगळ्या परवानग्या घेत, जे जे करावे लागते, ती प्रत्येक गोष्ट करून भाजपने स्वत:चे पैसे खर्च ही जागा विकत घेतलेली आहे. त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, हे अतिशय स्पष्टपणे सांगतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App